कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला; अजित पवारांकडून पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : “कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं आहे. कोल्हापूरच्या… pic.twitter.com/1y1bZJ5cXs
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 23, 2024
निष्ठावान नेतृत्व गमावले : विजय वडेट्टीवार
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला बळ मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना, अशा शब्दात विधीमंडळातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे.
श्री.पी एन पाटील यांना भावपूर्ण… pic.twitter.com/OzDkryw4i8
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 23, 2024
हेही वाचा :
आमदार पी. एन. पाटील : गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच उभा करणारे नेते
आमदार पी. एन. पाटील : काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार आणि सहकारातील आदर्श नेतृत्व
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे निधन