नेट-सेट, पीएच. डी. संघर्ष समितीतर्फे आंदोलन; हजारो प्राध्यापकांचा असणार सहभाग 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नेट-सेट, पीएच. डी. संघर्ष समितीच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांना प्राध्यापक भरती 100 टक्के पूर्ण व्हावी, या मागणीसाठी येत्या 5 जूनपासून केल्या जाणार्‍या बेमुदत धरणे आंदोलनाचे निवेदन दिले आहे. तसेच, मागण्या पूर्ण होईपर्यंत आरपारची लढाई अशा पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे, असे नेट-सेट, पीएच. डी.धारक संघर्ष समितीच्या …

नेट-सेट, पीएच. डी. संघर्ष समितीतर्फे आंदोलन; हजारो प्राध्यापकांचा असणार सहभाग 

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नेट-सेट, पीएच. डी. संघर्ष समितीच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांना प्राध्यापक भरती 100 टक्के पूर्ण व्हावी, या मागणीसाठी येत्या 5 जूनपासून केल्या जाणार्‍या बेमुदत धरणे आंदोलनाचे निवेदन दिले आहे. तसेच, मागण्या पूर्ण होईपर्यंत आरपारची लढाई अशा पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे, असे नेट-सेट, पीएच. डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट केले आहे.
संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने मागील पाच आंदोलनांमध्ये उच्च शिक्षणामध्ये अतिशय ज्वलंत अशा प्राध्यापक भरती या विषयावर वेळोवेळी आंदोलन केले. 2017 च्या 2088 व अकृषी विद्यापीठांमधील 659 या पदांची भरती आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. हजारो प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरली जावीत, यासाठी पुण्यातील संचालक कार्यालयासमोर संघर्ष समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये राज्यभरातून हजारो प्राध्यापकांचा सहभाग असणार आहे.
संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या

यूजीसी व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची 100 टक्के पदे भरली जावीत.
तासिका तत्त्वाचे शोषण करणारे धोरण थांबवून समान कामाला समान वेतन दिले जावे.
2017 ची प्राध्यापक भरती गतिमान करून ती पदे त्वरित भरली जावीत.
कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ कायम प्राध्यापकांची नेमणूक केली जावी.

हेही वाचा

‘एमएचटी’च्या उत्तरतालिकेवर नोंदविता येणार आक्षेप
कोल्हापूर : गडहिंग्लज, कडगाव, सैनिक टाकळीत वादळाने थरकाप; भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू
अलमट्टी पाणी पातळी मर्यादा 517.50 मीटरपर्यंतच ठेवणार