तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा खुला; ‘या’ लिंकवर नोंदवा अभिप्राय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागाच्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याची आतुरतेने वाट पाहणार्‍या शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अन्य घटकांसाठी आजपासून तो खुला करण्यात येणार आहे. हा आराखडा वाचून त्यावर अभिप्राय नोंदविण्याची जनतेला संधी देण्यात आली असून, त्यावर जास्तीत जास्त अभिप्राय पाठवावेत, असे आवाहन विद्या प्राधिकरणाचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे. …
तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा खुला; ‘या’ लिंकवर नोंदवा अभिप्राय

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिक्षण विभागाच्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याची आतुरतेने वाट पाहणार्‍या शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अन्य घटकांसाठी आजपासून तो खुला करण्यात येणार आहे. हा आराखडा वाचून त्यावर अभिप्राय नोंदविण्याची जनतेला संधी देण्यात आली असून, त्यावर जास्तीत जास्त अभिप्राय पाठवावेत, असे आवाहन विद्या प्राधिकरणाचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.
तिसरी ते बारावीचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आला आहे. हा मसुदा परिषदेच्या https:///www.maa.ac.in या संकेतस्थळावर आज गुरुवार (दि. 23) पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात येणार आहे.
संबंधित मसुद्याबाबत सर्व समाजघटक, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दि. 3 जूनपर्यंत विद्या प्राधिकरणाने दिलेल्या लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
अभिप्राय नोंदवत असताना आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील द्यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते, याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, याचा समावेश असावा.
पोस्टाने अभिप्राय पाठविणार असल्यास त्यावर एससीएफ-एसई राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)-2024 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरांत लिहून विद्या प्राधिकरणाकडे पाठवावे, असे देखील विद्या प्राधिकरणामार्फत कळविण्यात
आले आहे.
अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी आणि लिंक
कालावधी : 23 मे ते 3 जून
लिंक :  https:///forms.gle/TDHL9z8 harzRgJoy5
हेही वाचा

Virat Kohli | क्रिकेटपटू विराट कोहली ‘इसिस’च्या निशाण्यावर!
भीमेत बुडालेल्या ६ जणांच्या मृत्यूची भीती; थांगपत्ता लागेना
भाजपला मत म्हणजे विकसित भारताचा संकल्प : पंतप्रधान मोदी