काळजी घ्या! भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट; देशभरात 324 तर महाराष्ट्रात 100 रुग्ण
नवी दिल्ली : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंगापुरात आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाला आहे. देशभरात या विषाणूचे 324 रुग्ण आढळले असून, महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे. केपी.2 आणि केपी1.1 तसेच फ्लर्ट या कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटनी हे नवे थैमान घातले आहे.
कोरोनाची डोकेदुखी संपली असे वाटत असतानाच पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. देशात रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आढळल्याने ही बाब अधिकच चिंताजनक मानली जात आहे. गोवा, प. बंगाल, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्येही रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा
मान्सूनचा अंदमान, निकोबार बेटांवर मुक्काम; मान्सून लवकरच केरळमध्ये पोहचणार
MLA P N Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
सोलापूर : आहेरगाव येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू