पुणे पोर्शे अपघात प्रकरण: न्यायालयाबाहेर अग्रवालवर शाईफेक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील (Pune Porsche accident case) आरोपीवर वंदे मातरम संघटनेकडून आज (दि.२२) शाईफेक करण्यात आली. विशाल अग्रवाल याला न्यायालयात नेताना हा प्रकार घडला. यावेळी न्यायालयाबाहेर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्य़ाची मागणी यावेळी करण्यात आली.
आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र पेटविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
