गोव्यात आणले जाणारे 15 कोटींचे ड्रग्ज मुंबईत जप्त

गोव्यात आणले जाणारे 15 कोटींचे ड्रग्ज मुंबईत जप्त

पणजी : आफ्रिकेतून (अदिस अबाबा-इथिओपिया) गोवा आणि इतर राज्यांत तस्करीसाठी आणलेले 15 कोटींचे 2 किलो कोकेन केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने जप्त केले आहे. या प्रकरणी मुंबईत एका हॉटेलवर उतरलेल्या ला गिलमोर या झांबियान प्रवाशाला आणि दिल्लीतून एमआर आगुस्तिनो या टांझानियन महिलेला अटक करण्यात आली आहे.
एनसीबी मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवा, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथे तस्करी करण्यासाठी आफ्रिकेतूनकोकेन येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीचे पश्चिम क्षेत्रीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चौकशी केली असता, गुरुवारी (दि.9) इथिओपिया येथून एक विदेशी प्रवासी आल्याची माहिती मिळाली. त्याचा विभागाने शोध घेतला असता, तो विदेशी नागरिक मुंबईतील एका हॉटेलात वास्तव्य करत असल्याचे समजले. त्यानुसार, विभागाने त्याची चौकशी केली असता, ‘ला गिलमोर’ हा झांबियान नागरिक असून, त्याला अदिस अबाबा – इथिओपिया येथून कोकेन घेऊन भारतात प्रवास करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, त्याची बॅग आणि इतर साहित्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बॅगेत लपवलेले 15 कोटी रुपयांचे 2 किलो कोकेन सापडले.
आंतरराष्ट्रीय तस्कराकडून सूचना…
विदेशी नागरिकाची कसून चौकशी केली असता, हा ड्रग्ज दिल्लीत एका महिलेला देण्याची सूचना आंतरराष्ट्रीय तस्करांनी त्याला केली होती, असे समजले. त्यानुसार, विभागाने त्याच्यामार्फत दिल्लीतील महिलेशी संपर्क साधून त्याला 11 रोजी दिल्लीत नेले. ठरल्याप्रमाणे महिला ड्रग्ज घेण्यासाठी आली असता, विभागाने तिला ताब्यात घेतले. या महिलेचे नाव एमआर आगुस्तिनो असून ती टांझानियन नागरिक आहे. त्यानंतर एनसीबीने दोघांना मुंबईत आणले आणि रितसर अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही विदेशी नागरिकांना मुंबईतील न्यायालयाने एनसीबीची कोठडीत ठोठावली.
The post गोव्यात आणले जाणारे 15 कोटींचे ड्रग्ज मुंबईत जप्त appeared first on पुढारी.

पणजी : आफ्रिकेतून (अदिस अबाबा-इथिओपिया) गोवा आणि इतर राज्यांत तस्करीसाठी आणलेले 15 कोटींचे 2 किलो कोकेन केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने जप्त केले आहे. या प्रकरणी मुंबईत एका हॉटेलवर उतरलेल्या ला गिलमोर या झांबियान प्रवाशाला आणि दिल्लीतून एमआर आगुस्तिनो या टांझानियन महिलेला अटक करण्यात आली आहे. एनसीबी मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवा, मुंबई, …

The post गोव्यात आणले जाणारे 15 कोटींचे ड्रग्ज मुंबईत जप्त appeared first on पुढारी.

Go to Source