घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : मृतांची संख्या १७ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील एकाचा आज (दि.२२) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील मृतांचा आकडा १७ वर गेला आहे. असे वृत्त एएनआयने बीएमसीच्या हवाल्याने दिले आहे. तर ७४  जखमींवर उपचार सुरू आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना  सोमवारी (दि,१३) झाली ७४ जखमींवर उपचार सुरु आहेत या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर काय आहे घाटकोपर …

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : मृतांची संख्या १७ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील एकाचा आज (दि.२२) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील मृतांचा आकडा १७ वर गेला आहे. असे वृत्त एएनआयने बीएमसीच्या हवाल्याने दिले आहे. तर ७४  जखमींवर उपचार सुरू आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना  सोमवारी (दि,१३) झाली
७४ जखमींवर उपचार सुरु आहेत
या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

काय आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना?
प्रचंड वादळी पाऊस आणि धुळीचे वादळ अकस्मात धडकल्याने सोमवारी (दि,१३) संध्याकाळी मुंबई, ठाणे परिसराची धुळधाण उडाली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग कोसळले (Mumbai Hoarding Collapse). या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला. आज (दि.२२) उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. असे बीएमसीने म्हटले आहे. तर ७४  जखमींवर उपचार सुरू आहेत.  इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जाहिरात एजन्सी या परिसरात होर्डिंग्ज लावण्यासाठी जबाबदार होती.
घाटकोपरचे दुर्घटनाग्रस्त होर्डिंग अनधिकृत
घाटकोपर येथे कोसळलेले महाकाय होर्डिंग (Mumbai Hoarding Collapse) अनधिकृत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या होर्डिंगला लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाची परवानगी होती. परंतु पालिकेचे नियम धाब्यावर बसवून १४ हजार ४०० चौरस फुट आकाराचे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले. दरम्यान, या होर्डिंगचा मालक भावेश भिडे व अन्य आरोपींवर पंतनगर पोलिसात महापालिकेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधील उदयपूर येथून अटक करून मुंबईत आणले होते. घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेने सहा सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे,
होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विष प्रयोग
घाटकोपर येथे पालिकेचे नियम धाब्यावर बसवून रेल्वे वसाहत येथे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले होते. ७ डिसेंबर २०२१ मध्ये होर्डिंग उभारण्यास रेल्वे लोहमार्ग आयुक्तांनी परवानगी दिली. पालिकेच्या होर्डिंग धोरणामध्ये ४० बाय ४० म्हणजे १ हजार ६०० चौरस फूट पर्यंत होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. परंतु युको मीडिया कंपनीने १२० बाय १२० म्हणजेच १४,४०० चौरस फूट होर्डिंग उभारले. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विष प्रयोग करण्यात आला होता. तर काही झाडे तोडण्यात आली. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. एवढंच नाही तर धोरणानुसार वोटिंगचं आकारमानही मोठे असल्यामुळे नोटीस बजावून हे काम थांबवण्यात आले होते. मात्र तरीही कंपनीने एप्रिल २०२२ पासून होल्डिंग उभारण्याचे काम सुरू केले.  Mumbai Hoarding Collapse

Ghatkopar hoarding collapse incident | One more person succumbs to his injuries during treatment. Death toll climbs to 17: BMC
— ANI (@ANI) May 22, 2024

हेही वाचा 

Mumbai Hoarding Collapse : अभिनेता कार्तिक आर्यनच्या सख्ख्या मामा-मामीचा मृत्यू, तीन दिवसांनी मृतदेह बाहेर काढले
Ghatkopar hoarding collapse | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे
Ghatkopar hoarding collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हे रेल्वेचेच पाप! वर्षाकाठी जीआरपी घेत होती ६ लाखांचे भाडे
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक