पुणे अव्वलच! बारावीच्या विभागीय निकालात सोलापूर दुसर्‍या, तर नगर तिसर्‍या स्थानी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा पुणे विभागाने अव्वल स्थान पटकाविले, तर सोलापूर विभाग दुसर्‍या स्थानी, नगर विभाग तिसर्‍या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल 92.93 टक्के लागला. त्यात पुणे जिल्ह्याने 93.20 …

पुणे अव्वलच! बारावीच्या विभागीय निकालात सोलापूर दुसर्‍या, तर नगर तिसर्‍या स्थानी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा पुणे विभागाने अव्वल स्थान पटकाविले, तर सोलापूर विभाग दुसर्‍या स्थानी, नगर विभाग तिसर्‍या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल 92.93 टक्के लागला. त्यात पुणे जिल्ह्याने 93.20 टक्क्यांसह विभागात आघाडी घेतली. पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्ष मंजूषा मिसकर आणि सचिव
औदुंबर उकिरडे यांनी निकाल जाहीर केला.
पुणे विभागातील 2 लाख 60 हजार 387 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 2 लाख 58 हजार 608 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 40 हजार 350 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 16 हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 794 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर 11 हजार 21 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 69.77 आहे, तर नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून 92.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुणे जिल्ह्यातून एकूण 1 लाख 38 हजार 949 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 1 लाख 38 हजार 152 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 28 हजार 761 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी 93.20 टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या 64 हजार 392 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 857 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील 58 हजार 964 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी 92.33 टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातील 57 हजार 46 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 56 हजार 599 विद्यार्थ्यांपैकी 52 हजार 625 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी 92.97 आहे.
शाखानिहाय निकाल
पुणे जिल्ह्यातून विज्ञान शाखेतील 78.54 टक्के, कला शाखेतील 67.05 टक्के, वाणिज्य शाखेतील 66.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 68.16 टक्के, कला शाखेचे 51.51 टक्के, वाणिज्य शाखेचे 47.01 टक्के; तर सोलापूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 74.77 टक्के, कला शाखेचे 78.36 टक्के, वाणिज्य शाखेचे 77.55 टक्के उत्तीर्ण झाल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाने दिली.
जिल्हानिहाय निकाल

पुणे : 93.20
अहमदनगर : 92.33
सोलापूर : 92.97
एकूण : 92.93

जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

पुणे : 1 लाख 28 हजार 761
अहमदनगर : 58 हजार 964 विद्यार्थी
सोलापूर : 52 हजार 625 विद्यार्थी

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती

आंबेगाव : 94.28
बारामती : 95.36
भोर : 93.66
दौंड : 93.21
हवेली : 94.78
इंदापूर : 95.58
जुन्नर : 92.90
खेड : 92.05
मावळ : 91.38
मुळशी : 95.54
पुणे शहर-पश्चिम : 91.27
पुरंदर : 92.86
शिरूर : 94.70
वेल्हा : 98.58
पुणे शहर-पूर्व : 91.91
पीसीएमसी : 94.74
एकूण – 93.20

दिव्यांगांची भरारी! राज्यात बारावीत 94.20 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यात बारावीच्या निकालात सामान्य मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 91.60 टक्के आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र सामान्य मुलांपेक्षा वरचढ कामगिरी करीत 94.20 टक्केवारी गाठली. त्यामुळे बारावीच्या निकालात या विद्यार्थ्यांनी ‘हम भी किसी से कम नहीं’ असा संदेश दिला. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सोयीसुविधा दिल्या होत्या, अशी माहिती मंडळाने दिली. यंदा परीक्षेसाठी एकूण 7 हजार 32 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 986 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. यातील 6 हजार 581 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.40 टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण 93.51 टक्के आहे, अशी माहिती मंडळाने दिली.
सर्वाधिक 1 हजार 804 विद्यार्थ्यांनी लोकोमोटर डिसॅबिलिटी प्रवर्गातून परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 1 हजार 695 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.64 टक्के आहे. त्यानंतर ब्लाइंडनेस गटातून 1 हजार 251 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 1 हजार 191 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 95.66 टक्के आहे. हिअरिंग इम्पेरमेंट गटातून 1 हजार 214 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 1 हजार 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 93.98 टक्के आहे. मंडळाने विद्यार्थ्यांची एकूण 22 दिव्यांग प्रकारच्या गटात परीक्षा घेतली. यातील दोन प्रकारांतील विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला, तर 14 प्रकारांतील विद्यार्थ्यांचा निकाल 90 टक्क्यांहून अधिक लागला. त्यामुळे यंदाच्या निकालात देखील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा

अलमट्टी पाणी पातळी मर्यादा 517.50 मीटरपर्यंतच ठेवणार
RCB vs RR : कोणाचा पत्ता कट होणार?
महिला व्यापताहेत उद्योगांचे आभाळ!