सिसोदियांना जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
सिसोदिया यांना ईडी आणि सीबीआयच्या दोन्ही कारवायांमध्ये जामीन दिला जाऊ शकत नाही, असे न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी स्पष्ट केले. मनीष सिसोदिया यांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सिसोदिया यांनी जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळाला नाही.
