Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उन्हाचा तडाखा काहीकेल्या कमी होत नाहीय. तीव्र उष्णतेचा फटका माणसांनाच बसत नाही, तर प्राण्यांनाही उष्ण वातावरणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक पाळीव प्राणी आजारीही पडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी त्यांचा पाळीव कुत्रा ‘यासा’ आजारी असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. एक व्हिडिओही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते ‘यासा’सोबत खेळताना दिसत आहेत.
राहुल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, ‘माझा BFF यासा याच्या जठराला गंभीररित्या संसर्ग झाला आहे. तो खूप आजारी आहे. मी खूप अस्वस्थ आणि निराश आहे. कृपया त्याला तुमचा आर्शिर्वाद, प्रेम आणि तुमच्या हृदयातील अफाट सकारात्मक ऊर्जा मिळू दे. जेणेकरून तो लवकर बरा होईल.’
सततच्या वाढत्या तापमानामुळे मानवाला अनेक पर्याय सापडत असले तरी मुक्या प्राण्यांना त्यांच्या वेदना व्यक्त करणे कठीण झाले आहे. जर तुम्ही पाळीव प्राणी प्रेमी असाल आणि तुमच्या घरात किंवा आसपास पाळीव प्राणी असतील तर त्यांची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे. शरीरावर केस असल्याने त्यांच्या त्वचेपर्यंत थंडी पोहोचणे कठीण होते. यामुळेच उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना विविध आजार होण्याचा धोका दुपटीने वाढतो. उष्माघात, कोंडा यासह बुरशीजन्य संसर्गाचा धोका असतो.
View this post on Instagram
A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi)
“Yassa has been very sick.
Please send him all your love, support and positive energy ❤️
Love you all”@RahulGandhi
❤️ 🤗 pic.twitter.com/YUZ0SpvpXz
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 20, 2024