बदाम मिसळलेले दूध अनेक बाबतीत लाभदायक

नवी दिल्ली : हल्ली अनेक लोक ‘वेगन’ बनत आहेत. ‘वेगन’ आहार म्हणजे साधा शाकाहार नव्हे. या आहारात कोणताही पशुजन्य आहार घेतला जात नाही. त्यामध्ये अंडीच काय, जनावरांचे दूधही पिले जात नाही. त्यामुळे अशा दुधाला पर्याय म्हणून वनस्पतीजन्य दुधाचा वापर ‘वेगन’ आहारात करतात. सोया मिल्क, अल्मंड (बदाम) मिल्क असे त्यासाठीचे काही पर्याय आहेत. इतरांसाठी असे बदामाचे …

बदाम मिसळलेले दूध अनेक बाबतीत लाभदायक

नवी दिल्ली : हल्ली अनेक लोक ‘वेगन’ बनत आहेत. ‘वेगन’ आहार म्हणजे साधा शाकाहार नव्हे. या आहारात कोणताही पशुजन्य आहार घेतला जात नाही. त्यामध्ये अंडीच काय, जनावरांचे दूधही पिले जात नाही. त्यामुळे अशा दुधाला पर्याय म्हणून वनस्पतीजन्य दुधाचा वापर ‘वेगन’ आहारात करतात. सोया मिल्क, अल्मंड (बदाम) मिल्क असे त्यासाठीचे काही पर्याय आहेत. इतरांसाठी असे बदामाचे दूधच नव्हे, तर बदाम मिक्स केलेले नेहमीचे दूधही लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.
दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे; पण तुम्हाला माहीत आहे का, की दुधात जर तुम्ही बदाम मिसळून प्यायले तर तुमच्या आरोग्याला दुहेरी फायदे होते. बदाम आणि दूध दोन्हीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. डॉक्टर बदाम खाण्याचा नेहमीच सल्ला देतात. बदाम आणि दूध प्यायल्याने शरीरातील कॅल्शिअमची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे कमकुवत हाडे मजबूत होतात. एवढेच नाही, तर या दोघांचे एकत्र सेवन केल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. बदाम आणि दुधात भरपूर पोषक घटक असतात. दुधात कॅल्शिअम, प्रथिने आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच बरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन-ई, प्रोटिन, फायबर आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळते.
बदाम आणि दूध एकत्र सेवन करणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन-ई तुमच्या निस्तेज त्वचेला आणि निर्जीव केसांना जीवदान देते. बदामाच्या दुधात भरपूर कॅल्शिअम असते, जे कमकुवत हाडे मजबूत करण्यास मदत करते. बदामाच्या दुधाचे सेवन हाडांच्या रुग्णांसाठी अमृतापेक्षा कमी नाही. बहुतांश महिलांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असते. अशा स्थितीत त्यांनी बदाम आणि दूध अवश्य सेवन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही खोकला, सर्दी आणि फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांना लवकर बळी पडता. अशा स्थितीत तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्त्वांनी युक्त बदामाच्या दुधाचे सेवन करावे.
तुमचे शरीर नेहमी थकलेले आणि सुस्त असेल, तर बदामाच्या दुधाचे सेवन सुरू करा. बदाम मिसळून दूध प्यायल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. यामुळे तुम्हाला बळही मिळेल. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर कधीही बदामाचे दूध घेऊ शकता. एक ग्लास गरम दुधात 3-4 बदाम मॅश करून टाकावेत. रात्री झोपण्यापूर्वी ते प्यावे. तसेच बदाम रात्रभर भिजत ठेवून व त्याची साल काढून दुधात बारीक करून सकाळी नाश्त्यानंतरही असे दूध पिता येते.