कोल्हापूर: कागल तहसील कार्यालयातील महिला कारकून ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कागल: पुढारी वृत्तसेवा: कागल तहसीलदार कार्यालयातील महसूल अव्वल कारकून अश्विनी कारंडे यांना ३० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातच रंगेहात पकडले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे. आज (दि.२१) दुपारी ४. १५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४.१५ च्या दरम्यान कार्यालयात कारंडे या कार्यालयात …
कोल्हापूर: कागल तहसील कार्यालयातील महिला कारकून ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कागल: Bharat Live News Media वृत्तसेवा: कागल तहसीलदार कार्यालयातील महसूल अव्वल कारकून अश्विनी कारंडे यांना ३० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातच रंगेहात पकडले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे. आज (दि.२१) दुपारी ४. १५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४.१५ च्या दरम्यान कार्यालयात कारंडे या कार्यालयात लाच स्वीकारत होत्या. यावेळी महसूल शाखेमध्ये बहुतांशी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कारंडे लाच घेताना पकडल्याचे समजताच महिला कर्मचारी टेबल सोडून बाहेर गेल्या. कार्यालयातील कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या होत्या. तर काहींना धक्का सहन न झाल्याने दुपारनंतर घर गाठले. मागील काही दिवसांपासून कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी देखील तहसीलदारसह तलाठी पंटर यांना देखील लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
हेही वाचा 

कोल्हापूर : वादळाचा तडाखा; वळवाने झोडपले
कोल्हापूर : एस.टी. चालकाचा कासारी नदीत बुडून मृत्यू
P N Patil | कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती स्थिर