सेन्सेक्स- निफ्टी चढ-उतारानंतर सपाट, कोणते शेअर्स तेजीत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदराबाबत घेतलेली सावध भूमिका आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२१) भारतीय शेअर बाजारात चढ- उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स ५२ अंकांनी घसरून ७३,९५३ वर बंद झाला. तर निफ्टी २७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,५२९ च्या सपाट पातळीवर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी …

सेन्सेक्स- निफ्टी चढ-उतारानंतर सपाट, कोणते शेअर्स तेजीत?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदराबाबत घेतलेली सावध भूमिका आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२१) भारतीय शेअर बाजारात चढ- उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स ५२ अंकांनी घसरून ७३,९५३ वर बंद झाला. तर निफ्टी २७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,५२९ च्या सपाट पातळीवर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
कोणते शेअसे तेजीत?
सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एसबीआय, टेक महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक तेजीत राहिले. तर नेस्ले इंडिया, मारुती, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले.
Sensex closing
निफ्टीवर हिंदाल्को, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर नेस्ले इंडिया, हिरो मोटोकॉर्प, मारुती हे शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
VIX निर्देशांक २३ महिन्यांच्या उच्चांकावर
भारतीय शेअरबाजाराचा चढ-उतार दर्शक (VIX) राष्ट्रीय सूचकांक जवळपास दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स किंवा India VIX इंट्राडे ट्रेडमध्ये सुमारे ८ टक्क्यांनी वाढून २२.३ च्या पातळीपर्यंत पोहोचला. ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालापूर्वी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेल्या विक्रीमुळे त्याने २३ महिन्यांचा उच्चांक नोंदवला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी अलीकडच्या काळात केलेल्या भारतीय शेअर्सच्या विक्रीमुळे शेअर्स बाजाराचा भयसूचकांक ‘व्हीक्स’ वाढला आहे.
आयटी शेअर्सवर दबाव
आज दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० बेंचमार्क निर्देशांक फायनान्सियल सर्व्हिसेस आणि आयटी शेअर्समधील घसरणीमु‍ळे खाली आले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी महागाईवाढीमुळे सावध भूमिका घेतली आहे. यामुळे उच्च व्याजदर अधिक काळ राहण्याच्या चिंतेमुळे आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले. कारण आयटी कंपन्या ह्या अमेरिकेतून अधिक महसूल मिळवितात. निफ्टी आयटीवर टीसीएस, इन्फोसिस या शेअर्समध्ये घसरण झाली. तर Mphasis, टेक महिंद्रा हे शेअर्स वाढले.
हे ही वाचा :

जाणून घ्या शेअर्स बाजाराचा भयसूचकांक ‘व्हीक्स’विषयी
मागील आठवड्यात बाजारात राहिली अनपेक्षित तेजी, कारण काय?
अर्थवार्ता