
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लहानपणापासूनच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित आहेत. संघानेच माझं व्यक्तिमत्त्व घडवलं. माझ्यातील धैर्य आणि देशभक्ती जागृत करण्यात मदत केली;पण मी कधीही माझ्या संस्थेचा उपयोग माझ्या करिअरसाठी केला नाही. कारण ते आमच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. न्यायदान करताना मी सर्वांना एकाच तराजूत तोलले, मग तो कम्युनिस्ट असो, भाजप, काँग्रेस किंवा तृणमूलचा असो. माझा कोणाशीही संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही. माझ्यासमोर सगळे समान होते, अशा शब्दांमध्ये कोलकाता उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांनी आपली आजवरची कारर्कीद मांडली. निवृत्ती दिनानिमित्त आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.
माझ्या कामामुळे ३७ वर्षे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’पासून लांब
यावेळी चितरंजन दास म्हणाले की, “आज मला माझे सत्य सांगायला हवे. मी एका संस्थेचा खूप आभारी आहे, मी लहानपणापासून तारुण्यापर्यंत तिथे होते. मी तिथे धाडसी, प्रामाणिक आणि इतरांचा विचार करणे, देशभक्ती आणि तुम्ही जिथे काम करता तेथील कामासाठी बांधिलकीची भावना शिकलो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चा सदस्य होतो आणि आहे हे मी मान्य केलेच पाहिजे. माझ्या कामामुळे मी जवळपास ३७ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून (RSS) अंतर ठेवले.”
सर्वांना न्याय दिला
मी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपयोग माझ्या करिअरसाठी केला नाही. कारण ते आमच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. मी सर्वांना एकाच तराजूत तोलले; मग तो कम्युनिस्ट असो, भाजप, काँग्रेस किंवा टीएमसीचा असो. माझा कोणाशीही संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही. माझ्यासमोर सगळे समान होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मी संघात परत जाण्यास तयार आहे’
निवृत्त झाल्यानंतर आता मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करायचे आहे. संघाने मला कोणत्याही मदतीसाठी किंवा कामासाठी बोलावले तर आता संघात परत जाण्यास तयार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कोण आहेत माजी न्यायमूर्ती चित्तरंजन दास?
माजी न्यायमूर्ती चित्तरंजन दास हे मूळचे ओडिशाचे रहिवासी आहेत. १९८६ मध्ये त्यांनी वकील म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये ते न्यायाधीश झाले. ओडिशातील विविध भागात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून
त्यांनी काम पाहिले. त्यांची ओरिसा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार (प्रशासन) म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर 2009 मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. 20 जून 2022 रोजी त्यांची कोलकाता उच्च न्यायालयात न्यायधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
