पोर्शे कार अपघात : पुण्याच्या व्यावसायिकाला संभाजीनगरातून अटक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पुणे येथे भरधाव कार चालवून एका अल्पवयीन चालकाने मोटारसायकलवरील दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी कार चालकाच्या वडीलांस संभाजीनगरातून (सोमवार) रात्री उशिरा अटक केली. विशाल सुरेंद्र अग्रवाल (वय 50) व्यवसाय – बिल्डरशिप रा. ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी पुणे) यांच्यासह त्याचे चत्रभूज बाबासाहेब डोळस (34 वडगाव शेरी पुणे) राकेश भास्कर पौडवाल (51 …

पोर्शे कार अपघात : पुण्याच्या व्यावसायिकाला संभाजीनगरातून अटक

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा पुणे येथे भरधाव कार चालवून एका अल्पवयीन चालकाने मोटारसायकलवरील दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी कार चालकाच्या वडीलांस संभाजीनगरातून (सोमवार) रात्री उशिरा अटक केली. विशाल सुरेंद्र अग्रवाल (वय 50) व्यवसाय – बिल्डरशिप रा. ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी पुणे) यांच्यासह त्याचे चत्रभूज बाबासाहेब डोळस (34 वडगाव शेरी पुणे) राकेश भास्कर पौडवाल (51 धनकवडी पुणे) यांनाही अटक केली आहे.
पुणे येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या (१७ वर्षीय) तरुणाने पोर्शे कारने कल्याणीनगर भागात दोन मोटारसायकलस्वारांना ठोकरले होते. या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, परंतु कार चालक अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी त्याच्या वडिलांसह त्याला मद्य पुरवनाऱ्यावरही गुन्हे दाखल करून या तिघांना सोमवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. ही कारवाई पुणे गुन्हे शाखा व छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या केली.
हेही वाचा : 

Pune Porsche Car Accident | ‘ही हत्या आहे, अपघात नाही’, पुणे अपघातातील मृत अभियंत्याच्या कुटुबियांची तीव्र प्रतिक्रिया 
Pune car accident case : मृत तरुणीच्‍या वडिलांची अपेक्षा,”अशी कारवाई करा की…”

Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघात : अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या बारमालकाला अटक