जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

जळगाव पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला 45 हजार 31 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 23 हजार 626 मुले व 18, 902 मुली असे एकूण 42 हजार 528 विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. जळगाव जिल्ह्याचा निकाल हा 94.88 टक्के लागला असून यामध्ये मुलांचा निकाल हा 93.73 टक्के तर मुलींचा 96.37 टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वांधिक …

जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला 45 हजार 31 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 23 हजार 626 मुले व 18, 902 मुली असे एकूण 42 हजार 528 विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.
जळगाव जिल्ह्याचा निकाल हा 94.88 टक्के लागला असून यामध्ये मुलांचा निकाल हा 93.73 टक्के तर मुलींचा 96.37 टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वांधिक निकाल हा चोपडा, धरणगाव, भडगाव, जळगाव ग्रामीण याठिकाणी सर्वांधिक निकाल लागला आहे. जिल्ह्यात मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे.
जळगाव जिल्ह्यामधून विविध शाखांमधून 25 हजार 312 विद्यार्थी तर 19,719 विद्यार्थिनी असे एकूण 45 हजार 31 मुलामुलींनी बारावीचा परीक्षा दिली होती. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 23,626 मुले तर 18,902 मुली असे एकूण 42 हजार 528 विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश आहे.
सायन्स शाखेचा निकाल असा
जिल्ह्यातील मुलांचा रिझल्ट 93.73 टक्के तर मुलींचा 96.37 टक्के लागला आहे. सायन्स या शाखेमध्ये 23 हजार 572 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी13,884 मुलांनी तर 9,656 मुली असे एकूण 23,540 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 23 हजार 211 विद्यार्थी पास झाले. यामध्ये मुले 98.20 टक्के तर मुली 99.01 असे पास झाले आहे. तर एकूण सायन्स शाखेचा निकाल ९८.६० टक्के लागलेला आहे.
कला शाखेचा निकाल असा 
कला शाखेमध्ये 14,992 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी मुले 7831 तर मुली 7025 असे एकूण 14856 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 13245 विद्यार्थी पास झाले. यात मुले 86.2 टक्के मुली 92.64 टक्के पास झालेले आहेत. तर एकूण कला शाखेचा निकाल हा 89.15 टक्के लागलेला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल असा
वाणिज्य शाखेमध्ये चार हजार 956 विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली होती. त्यापैकी मुले 2402, मुली 2535 असे एकुण 4937 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी 4766 विद्यार्थी पास झाले असून मुले 95.25 टक्के तर मुली 97. 27 टक्के असे एकूण वाणिज्य शाखेचा निकाल 96.53 टक्के लागलेला आहे.
एच एस सी voc या विभागातील १४७९ जणांनी नोंदणी केली. त्यापैकी मुले 1057, मुली 397 असे एकूण 1454 जण परीक्षेला बसलेले होते. यापैकी मुले ८६.६६ टक्के तर मुली 90 टक्के उत्तीर्ण झाले.  शाखेचा निकाल ८७.६८ टक्के लागलेला आहे.
TEH sci या शाखेत बत्तीस विद्यार्थी होते व पूर्ण 32 चे 32 विद्यार्थी हे शंभर टक्के उत्तीर्ण झाले आहे.
अमळनेर 95.92, भुसावळ 95.06, बोदवड 88.20, भडगाव 96.14, चाळीसगाव 93.99, चोपडा 97.15, धरणगाव 96.02, एरंडोल 90.28, जळगाव 92.82, जामनेर 94.52, मुक्ताईनगर 94.78, पारोळा 93.89, पाचोरा 95.50, रावेर 93.34, यावल 94.62, जळगाव ग्रामीण 96.11 असा एकूण 94.88 टक्के निकाल लागला आहे.
हेही वाचा –

Jalgaon Lok Sabha 2024 | जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक, कार्यक्षम यंत्रणा सज्ज
Nashik Bus Fire News | सप्तशृंग गडावर टेम्पो ट्रॅव्हलला आग, बस जळून खाक
Nashik Lok Sabha Election 2024: परदेशातून येत बजावला मतदानाचा हक्क