तापमान वाढीमुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जळगाव जिल्ह्यात तीन मोठी धरणे, तेरा मध्यम प्रकल्प, दोन बंधारे असे असतानाही गेल्या हतनूर, गिरणा, वाघुर या मोठ्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 6.8 टक्के, २.४७ टीएमसी, 69.89 दलघमी पाणीसाठा कमी आहे. यावर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान 45 ते 46 अंशापर्यंत गेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. आज हतनुर धरणामध्ये 0.36 …

तापमान वाढीमुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- जळगाव जिल्ह्यात तीन मोठी धरणे, तेरा मध्यम प्रकल्प, दोन बंधारे असे असतानाही गेल्या हतनूर, गिरणा, वाघुर या मोठ्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 6.8 टक्के, २.४७ टीएमसी, 69.89 दलघमी पाणीसाठा कमी आहे. यावर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान 45 ते 46 अंशापर्यंत गेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. आज हतनुर धरणामध्ये 0.36 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये हतनुर, गिरणा, वाघुर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. यानंतर जामदा बंधारा व दहिगाव बंधारा हे दोन बंधारे असून 13 मध्यम प्रकल्प आहे. यात मन्याड, बोरी, भोकरबारी, सुकी, अभोरा, अग्निवती, तोंडापूर, हिवरा, मंगरूळ, बहुळा, मोर ,अंजनी गुळ अशी मध्यम प्रकल्प आहेत.
पाण्याचे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन
यामध्ये यावर्षी दि. 21 पर्यंत हतनूर धरणामध्ये 94.60 दलघमी तर 3.34 टीएमसी तर 37.10 टक्के जलसाठा आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी 137 दलघमी तर 4.84 टीएमसी व 53.73 टक्के जलसाठा होता. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 16.30 टक्क्यांनी हतनुर धरणातील जलसाठा कमी झालेला आहे. यात मुख्यतः बाष्पीभवनाचे एक कारण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान हे 45 ते 46 अंशावर पोचलेले आहे. त्यामुळे हातनूर धरणात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. 17 तारखेला 0.37, 18 तारखेला 0.25, 19 तारखेला 0.37 , 20 तारखेला 0.41,21 तारखेला 0.36 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची माहिती हातनुर धरणाचे अभियंता एस जी चौधरी यांनी दिली.
तर गिरणा मध्ये 21 तारखेपर्यंत 108.67 दलघमी 3.84 टीएमसी 20.77 टक्के जलसाठा आहे. तर गतवर्षी याच दिवशी 127.52 दलघमी 4.50 टीएमसी, 24.36 टक्के जलसाठा होता. तर गिरणा मध्ये गतवर्षीपेक्षा 18.76 दलघमी 0.66 टीएमसी व 3. 59 टक्के जलसाठा हा कमी आहे.
वाघुर धरणामध्ये 21 तारखेपर्यंत 157.54 दलघमी,5.56 टीएमसी 63.38टक्के जलसाठा आहे. तर गतवर्षी 166.26 दलघमी 5.87 टीएमसी 66.89 टक्के जलसाठा होता. गतवर्षीपेक्षा यावर्षी 8.72 दलघमी,0.31 टीएमसी3.51 टक्के जलसाठा कमी आहे.
तर मध्यम प्रकल्पामध्ये मन्याड बोरी भोकरबारी अग्निवती हिवरा या प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी व यावर्षी शून्य टक्के साठा आहे तर माञ यावर्षी 21 मे रोजी सुकी 64.44 अभोरा 66.14 तोंडापूर 15.87 मंगरूळ 43.14 बहुळा 19.88 मोर 65.69 अंजनी 2.52 गुळ 44.27 टक्के पाणी साठा आहे. सुकी, अभोरा ,तोंडापूर, मंगरूळ, बहुळा, मोर ,अंजनी, गुळ या प्रकल्पांमध्येही गेल्या वर्षी शून्य टक्के साठा होता.ॉ
हेही वाचा –

Pune car accident case : मृत तरुणीच्‍या वडिलांची अपेक्षा,”अशी कारवाई करा की…”
‘मतदान का केलं नाही?’: खासदार सिंन्‍हांना भाजपने बजावली नोटीस