जॅकलिनची ९ वर्षांनंतर Cannes मध्ये एन्ट्री; ऑफ शोल्डर बॉडीकॉन..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या राय आणि कियारा अडवाणी सारख्या अभिनेत्रींनी कान्स २०२४ मध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर आता जॅकलीन देखील या यादीत सामील झाली आहे. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ७७ व्या सोहळ्याला हजेरी लावली. तिच्या कस्टम मेड गाऊन लूकने सर्वांचे लक्ष वेधले. जॅकलिनने सोमवारी पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक केला. तिने ऑफ शोल्डर बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता. मिशेल डी कॉचरच्या गुलाबी कस्टम गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांना तिची पहिली झलक पाहून खूप आनंद झाला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी सुंदर कॉमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ती खूप सुंदर आणि क्लासी दिसत आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हॉट जॅकी दिसत आहे.’ एका यूजरने लिहिले की, ‘अरे व्वा खूप सुंदर.’
काय म्हणाली होती जॅकलिन फर्नांडिस?
कान्समध्ये जाण्यापूर्वी जॅकलीनने याबद्दल म्हटले होते की, ‘मी या वर्षी पुन्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मी त्याची प्रतीक्षा करू शकत नाही. रेड कार्पेटवर चालणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे, जिथे अनेक दिग्गजांनी याआधीच वॉक केले आहे.’
९ वर्षांनंतर कान्समध्ये जॅकलिन फर्नांडिस
जॅकलीन कान्समध्ये येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्ये, तिला मलेशियाच्या राणीने आमंत्रित केले होते आणि ती नाओमी कॅम्पबेलच्या ४५ व्या वाढदिवसाच्या पार्टीला बोटीवर उपस्थित राहिली होती.
View this post on Instagram
A post shared by Jacqueliene Fernandez (@jacquelienefernandez)
हेदेखील वाचा-
Nancy Tyagi : UPSC सोडून शिवणक्लास शिकली; तेच कपडे घालून Cannes मध्ये घडवला इतिहास
‘बिग बॉस मराठी’ नवा सिझन घेऊन येतोय ‘हा’ मराठमोळा अभिनेता
बोटावर शाई..चेहऱ्यावर सुरकुत्या..कमल हासन यांच्या ‘Indian 2’चे दमदार पोस्टर
