ब्रेकिंग: मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, काेठडीत ३१ मेपर्यंत वाढ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज (२१ मे) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणी १४ मे रोजी युक्तीवादानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. आता या प्रकरणी ३१ मे राेजी पुढील सुनावणी हाेणार आहे.
दिल्ली मद्य धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी सिसोदिया यांनाअटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. तिहार तुरुंगात चौकशी केल्यानंतर ‘ईडी’ ने ९ मार्च २०२३ रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांना अटक केली हाेती. सिसोदिया यांनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. दिल्ली सरकारने १७ नोव्हेंबर 2021 रोजी मद्य धोरण लागू केले होते; परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या अखेर ते रद्द करण्यात आले होते.


Home महत्वाची बातमी ब्रेकिंग: मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, काेठडीत ३१ मेपर्यंत वाढ
ब्रेकिंग: मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, काेठडीत ३१ मेपर्यंत वाढ
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज (२१ मे) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणी १४ मे रोजी युक्तीवादानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. आता या प्रकरणी ३१ मे राेजी पुढील सुनावणी हाेणार आहे. …