मुलीची हत्या करून पित्याने बेडरूममध्ये पुरला मृतदेह
Bharat Live News Media ऑनलाईन ; बिहारच्या मोतिहारीमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापलेल्या व्यक्तीने आपल्या स्वत:च्या मुलीचीच हत्या केली आणि तीचा मृतदेह बेडरूममध्येच पुरला. यानंतर आरोपी रात्री त्याच खोलित झोपला. सकाळी उठल्यानंतर तो तेथुन फरार झाला. मृत मुलीच्या भावाने या धक्कादायक घटनेची पोलिसांसमोर पोल खोल केली.
कशी घडली घटना :
स्वत:च्या मुलीचीच हत्या करून बापाने मृतदेह बेडरूममध्ये पुरला
सकाळीआराेपी फरार
मुलीच्या भावाने पाेलिसांना दिली माहिती
एकाला अटक, आराेपीचा शाेध सुरू
हत्येची ही घटना पूर्वी चंपारणच्या रामगढवा पोलिस ठाणे परिसरातील मुरला गावात झाली होती. भगवान दास नावाच्या व्यक्तीच्या घरात दारू पिण्यावरून घरात भांडण झाले होते. भांडणानंतर पतीपासून वाचण्यासाठी पत्नी शेजाऱ्यांच्या घरी निघुन गेली. मात्र दारू पिण्याच्या कारणावरून आरोपी भगवान दास याचे त्याची मुलगी राणी सोबतही भांडण होउ लागले. यानंतर आरोपीने क्रुरतेचा कळस करून मुलीचीच हत्या करून तीचे प्रेत बेडरूम मध्ये खड्डा खणून त्यात पुरले.
प्रेतावर मीठ टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
आरोपी पित्याने प्रेतासाठी खणलेल्या खड्ड्यात ४ किलो मीठ टाकले कारण मृतदेहाचे लवकर विघटण व्हावे. यानंतरही निर्दयी बाप रात्रभर त्याच खोलीत झोपी गेला. यानंतर सकाळी तो फरार झाला. मुलीची हत्या गळ्यात फंदा लावून करण्यात आली होती.
मृत राणीचा गुन्हा इतकाच होता की, ती आपल्या दारूड्या पित्याला दारू पिण्यापासून रोखत होती. तीचा बाप दारू पिउन तीच्या आईला मारझोड करायचा याचा ती विरोध करायची. हत्येची ही घटना शनिवारी घडली.
सकाळी जेंव्हा बायको घरी आली तेंव्हा ती आपल्या मुलीला शोधू लागली. खूप शोधाशेध करून देखील मुलगी तीला सापडली नाही. तेंव्हा गोंधळलेल्या आईने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तेंव्हा मृत बहिणीच्या निरागस भावाने या हत्याकांडाचा खुलासा केला.
मुलाने आरोपी बापाचे पितळ उघडे पाडले
भावाने हत्येची सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. त्याने सांगितले की, वडिलांनीच बहिणीची हत्या केली आहे. मुलाच्या सांगण्यावरून पोलिसांनी जेंव्हा बेडरूममध्ये जमिन खणून पाहिली तेंव्हा मुलीचा मृतदेह आढळला. तेंव्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्या आणखी एका काकाला अटक केली, अन् आरोपी बापाच्या शोधासाठी पथके रवाना केली.
हेही वाचा :
Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन
पब संस्कृतीमुळे तरुणाई नशेच्या विळख्यात; रेस्टॉरंट, बार, पबचा मुद्दा ऐरणीवर
भाडेकरार संपल्यास घर रिकामे करावेच लागेल! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल