बिहारच्या सारणमध्ये मतदानानंतर हिंसाचार; गोळीबारात एक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर हिंसाचार (Bihar Violence) घडला आहे. आज (दि.२१) सकाळी सारण येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला, त्यात तीन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी मतदान केंद्रावर झालेल्या वादातून ही घटना घडली. माजी …

बिहारच्या सारणमध्ये मतदानानंतर हिंसाचार; गोळीबारात एक ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर हिंसाचार (Bihar Violence) घडला आहे. आज (दि.२१) सकाळी सारण येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला, त्यात तीन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी मतदान केंद्रावर झालेल्या वादातून ही घटना घडली. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी रोहिणी आचार्य या मतदानानंतर छपरा शहरातील एका बूधवर पोहोचल्यावर वाद झाला. बूथ क्रमांक ३१८ आणि ३१९ वर हा वाद झाला होता. आज सकाळी एका पक्षाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर छपराच्या भिखारी ठाकूर चौकाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सारणमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा : 

अहमदाबाद विमानतळावरून ‘इसिस’चे चौघे दहशतवादी अटकेत
इराण राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल भारतात एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा

Go to Source