मतदान केंद्रात स्टंटबाजी! पंचवटी पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल

पंचवटी : Bharat Live News Media वृत्तसेवा – सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस तरुण, तरुणींकडून वाढत चालला असून कुठलीही बाब सोशल मीडियावर विविध क्लुप्त्या करून त्या व्हायरल करून फेमस होण्याकडे सर्वांचाच कल असतो. निवडणुकीपूर्वी पिंपळगाव येथे झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये एका युवक शेतकऱ्यांनी कांद्याचा प्रश्नावर बोला असे भर सभेत बोलत लक्ष वेधून घेतले होते. या घटनेची दखल घेत अक्षरशः या युवक शेतकऱ्याची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी घेतली व पत्रकारांच्या प्रश्नावर जर तो आमचा कार्यकर्ता असेल तर तो आमचा कार्यकर्ता आहे असे जाहीर केले. यामुळे या निवडणुकीत कांद्याची माळ व कांदा हे एक फेमस होण्याचे साधन झाले असून सोमवार, (दि.२०) रोजी सी डी ओ मेरी शाळा येथील मतदान केंद्रावर एका नवमतदार युवकाने ईव्हीएम मशीन समोर कांदा ठेवून छायाचित्र काढल्याचे निदर्शनास आले असता मतदान केंद्रातील अधिकारी यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करत, घडलेला प्रकार सांगितला या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते
“अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांच्या तीन कार्यकर्त्यावर तक्रार दाखल”
एकलव्य निवासी आश्रमशाळा या मतदान केंद्रामध्ये दुपारच्या सुमारास अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांचे समर्थक शिवम् संजय दाभाडे, विजय सुभाष दाभाडे व अजय सुभाष दाभाडे हे शांतीगिरी महाराज यांची बादली ही निशाणी असलेली त्यांचे नाव असलेल्या चिठ्ठ्या मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसराच्या आतमध्ये वाटप करत असताना आढळून आले. याबाबत त्यांना समज देण्यात आली होती. परंतु त्यांनी पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर पुन्हा ते मतदान केंद्र परिसरात फिरताना आढळल्यामुळे त्यांचेवर पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा:
‘एआय’चे जनकच म्हणतात, यापासून मानवी अस्तित्वाला धोका!
देशभरातील अंदाज चुकला, नियोजन कोलमडले!
बारावी परीक्षेचा आज निकाल
