कोल्हापूर : भरधाव कारच्या धडकेत हालोंडीचा तरुण ठार
शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर हालोंडी ता. हातकणंगले येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस कारची जोराची धडक बसल्याने हालोंडी येथील तरूण जागीच ठार हा अपघात मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्यासुमार घडला .अपघात मयत झालेल्या तरूणाचे नाव भरत बाळासाहेब परीट ( वय ४२ रा शिवाजी चौक हालोंडी ता हातकणंगले ) असे आहे.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेलीमाहिती अशी अपघातातील मयत भरत बाळासाहेब परीट हा मौजे वडगाव फाट्यावर असणाऱ्या सन इलेक्ट्रीक या कंपनीत नोकरी करत होता. तो मंगळवारी चारच्या दरम्यान आपल्या मोटरसायकल (क्र. एम एच ०९ डी व्ही 34 74 ) वरून कामावर निघाला होता . त्यावेळी मोटरसायकलवरून रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून सांगलीकडे निघालेल्या कार ( क्र्. एम एच १० डी व्ही ४१६७ ) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने भरत हा मोटारसायकलवरून जवळपास 100 फूट फरपटत गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. ही धडक प्रचंड जोराची असल्याने कारचे दोन्ही बाजूची एअर बॅग उघडल्याने कार मधील चालकासह प्रवासी सुदैवाने बचावले. भरत परीट हा दहा मिनिटापूर्वीच घरातून बाहेर पडला होता आणि त्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता .यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाले आहे.
The post कोल्हापूर : भरधाव कारच्या धडकेत हालोंडीचा तरुण ठार appeared first on पुढारी.
शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर हालोंडी ता. हातकणंगले येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस कारची जोराची धडक बसल्याने हालोंडी येथील तरूण जागीच ठार हा अपघात मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्यासुमार घडला .अपघात मयत झालेल्या तरूणाचे नाव भरत बाळासाहेब परीट ( वय ४२ रा शिवाजी चौक हालोंडी ता हातकणंगले ) असे आहे. घटनास्थळ व पोलिसातून …
The post कोल्हापूर : भरधाव कारच्या धडकेत हालोंडीचा तरुण ठार appeared first on पुढारी.