राजगड पायथ्याला छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी वसवलेले शहर; तटबंदी उत्खननात उजेडात

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी वसविलेल्या शिवपट्टण (राजवाडा) या आधुनिक दर्जाच्या शिवकालीन शहराच्या चोहोबाजूंची अभेद तटबंदी (संरक्षण भिंत) उत्खननात उजेडात आली आहे. जवळपास 100 मीटरहून अधिक लांब व 50 मीटर रुंद अंतराच्या तटबंदीचा मूळ पाया उत्खननात सापडला आहे. गेल्या वर्षी …

राजगड पायथ्याला छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी वसवलेले शहर; तटबंदी उत्खननात उजेडात

दत्तात्रय नलावडे

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी वसविलेल्या शिवपट्टण (राजवाडा) या आधुनिक दर्जाच्या शिवकालीन शहराच्या चोहोबाजूंची अभेद तटबंदी (संरक्षण भिंत) उत्खननात उजेडात आली आहे. जवळपास 100 मीटरहून अधिक लांब व 50 मीटर रुंद अंतराच्या तटबंदीचा मूळ पाया उत्खननात सापडला आहे.
गेल्या वर्षी पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खननास सुरुवात केली. त्या वेळी राजवाडा व इतर वास्तूंचे अवशेष सापडले. त्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष सापडले आहेत. शासनाने शिवपट्टण स्थळाच्या संवर्धनासाठी 22 कोटी रुपयांचा निधी पुरातत्व विभागाला दिला आहे. तटबंदीच्या मधोमध असलेल्या शिवपट्टण (शहर) मध्ये शिवरायांच्या राजवाड्यासह सैन्य, शिलेदार, बारा बलुतेदार, व्यापारी, शस्त्र साठा, घोडदळ, पायदळ, बाजारपेठ आदी वास्तूंचे मूळ अवशेष उत्खननात यापूर्वीच सापडले आहेत.
उत्खननात सापडलेले शिवपट्टण शहर हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे सत्ता केंद्र आहे. अशा प्रकारचे देशातील हे अत्यंत महत्त्वाचे शिवकालीन स्थळ आहे. त्यामुळे छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय, मानवकल्याणकारी कार्याचा जिवंत वारसा पुढे आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये शिवपट्टण संवर्धनाचे काम अडकून पडू नये, यासाठी पुरातत्व विभागाने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात शिवपट्टण वाड्याच्या चोहोबाजूच्या तटबंदीच्या अवशेषांच्या उत्खननास सुरुवात केली. कडक ऊन व अवकाळी पाऊस अशा अडचणींना तोंड देत 100हून अधिक मजूर तसेच पुरातत्व विभागाचे प्रमुख अधिकारी उत्खननाचे काम करत आहेत.
अनेक प्रसंगांत शिवपट्टणचा उल्लेख
1648 ते 1673 असे तब्बल 25 वर्षे छत्रपती श्रीशिवरायांच्या राजपरिवारासह सर्वाधिक काळ राजगडावर वास्तव्य होते. तसेच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाचा जगभर दरारा होता. शिवभारत, जेधे शकावली तसेच भारतीय व परकियांच्या कागदपत्रांत राजगडाच्या शिवपट्टण येथे श्रीशिवाजी महाराज असल्याचे ऐतिहासिक नोंदी आहेत. प्रतापगड मोहीम, पन्हाळा, सुहगड मोहीम आदी मोहिमांच्या प्रसंगात शिवपट्टणचा उल्लेख आहे.
शिवपट्टण म्हणजे शहर आहे. त्यामुळे या स्थळाला महत्त्व आहे. दगड, विटा, चुन्यात शिवकालीन बांधकाम शैलीत असलेल्या शिवपट्टणची चोहोबाजूंची संपूर्ण तटबंदी उत्खननात सापडली आहे. त्यामुळे तटबंदीसह वाड्याच्या आतील भागात उत्खननात सापडलेल्या वास्तू स्थळांचे मूळ शैलीत संवर्धन करण्यात येणार आहे. बांधकामासाठी जुन्या शिवकालीन विटांची निर्मिती केली जात आहे. चुन्याचा वापर करून प्रवेशद्वार व इतर वास्तूंचे मूळ स्वरूपात उभारणी करण्यात येणार आहे. छत उभारून काही ठिकाणी पावसाळ्यातही काम करता येईल.
– डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग, पुणे.

हेही वाचा

पोटगीही न देणार्‍या पतीने एका दिवसात मोजले 15 लाख..
बारावी परीक्षेचा आज निकाल
‘कोव्हॅक्सिन’ दुष्परिणामांबाबतचे संशोधन चुकीचे : ‘आयसीएमआर’