आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : तुमच्या स्वभावाचा काही लोक चुकीचा फायदा घेऊ शकतात.
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सुसंवाद राखाल. जेवढे शक्य असेल तेवढेच काम करण्याची तयारी ठेवा. भावनांच्या आहारी वाहात जावू नका. तुमच्या स्वभावाचा काही लोक चुकीचा फायदा घेऊ शकतात. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. मुलांना सर्जनशील कार्यात गुंतवून ठेवा. अन्यथा त्यांचे लक्ष चुकीच्या कामांकडे जाऊ शकते. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
वृषभ : आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिकदृष्या शुभ आहे
श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिकदृष्या शुभ आहे. नित्यक्रम व्यवस्थित ठेवण्यासाठी फक्त तुमचे निरीक्षण करा. घरातील ज्येष्ठ सदस्य कामात मदत करतील. प्रत्येक कार्यात स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. इतरांच्या सल्ल्यामुळे तुम्ही नुकसान करू शकता. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे योग्य राहिल. कार्यक्षेत्रात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. घरातील सदस्य एकमेकांशी सुसंवाद साधतील.
मिथुन: तरुणाईला मेहनतीच्या जोरावर करिअरमध्ये यश मिळू शकते
आजचा दिवस मनाप्रमाणे व्यतित करता येईरू. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये कोणतेही धार्मिक नियोजन देखील शक्य आहे. दुपारनंतर प्रतिकुलता जाणवेल. जवळच्या नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी शांत राहणे चांगले, असा सल्ला श्रीगणेश देतात. तरुणाईला मेहनतीच्या जोरावर करिअरमध्ये यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क : आज तुमचं आर्थिक नियोजन यशस्वी होईल.
आज तुमचं आर्थिक नियोजन यशस्वी होईल. मात्र अति कामामुळे थकवा जाणवेल. चिडचिड होऊ शकते. तुमच्या आवडीच्या कामात थोडा वेळ घालवा. तुमची इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायात मेहनत करण्याची वेळ आली आहे. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध असू शकतात. असंतुलित आहारामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात.
सिंह : कुटुंबातील सदस्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या कामांना प्राधान्य द्याल. मालमत्तेशी संबंधित काही योजना असतील तर त्या त्वरित पूर्ण करा. कुटुंबातील सदस्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकाला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तुमच्या मदतीची आवश्यकता असेल. व्यवसायात थोडी मंदी येऊ शकते. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ शकतो.
कन्या : तरुणही त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय होतील
आज ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल राहील, असे श्रीगणेश सांगतात. काही काळापासून सुरू असलेल्या तणावातूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. घरातील सुखसोयींशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. तरुणही त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय होतील. वाहनासह इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी मोठा खर्च होऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होऊ शकते.
तूळ : तरुणांना त्यांच्या करिअरबाबत योग्य सल्ले मिळतील
श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणतील; पण कोणाचीही चिंता न करता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कामावर लक्ष केंद्रित करा. तरुणांना त्यांच्या करिअरबाबत योग्य सल्ले मिळतील. मात्र दिनचर्येबरोबर मनावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अहंकारी वृत्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेवू शकते. कुटुंबातीलसदस्यांसोबतच वेळ व्यतित करा. व्यवसायातील सर्व घडामोडींवर लक्ष केंद्रीत करणे फायदयाचे ठरेल.
वृश्चिक : बाजारात तुमची क्षमता तुम्हाला नवीन यश मिळवून देईल
आज सामाजिक कार्यातील निस्वार्थ योगदान तुम्हाला आध्यात्मिक आनंद देईल. प्रतिष्ठित लोकांशीही लाभदायक संपर्क होईल. गुंतवणुकीशी संबंधित कामे पूर्ण करण्यावर भर द्या. कोणत्याही कारणास्तव घरातील व्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचना श्रीगणेश करतात. चुकीच्या बोलण्यामुळे विद्यार्थी ध्येयापासून दूर जाऊ शकतात. बाजारात तुमची क्षमता तुम्हाला नवीन यश मिळवून देईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
धनु : कार्यक्षेत्रात कामे शांततेने पूर्ण होतील
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही जवळच्या लोकांच्या भेटीबरोबरच मनोरंजनात वेळ व्यतित कराल. कोणत्याही विशिष्ट समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो. तरुणाई करिअरबाबत पूर्णपणे गंभीर असतील. चुकीच्या कामात जास्त खर्च झाल्याने मन थोडे अस्वस्थ राहील. अत्यंत सावधगिरीने सुव्यवस्था राखण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात कामे शांततेने पूर्ण होतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांना पूर्ण पाठिंबा असेल.
मकर: तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी सर्जनशील दृष्टीकोन स्वीकाराल
श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी सर्जनशील दृष्टीकोन स्वीकाराल. जवळच्या नातेवाईकाच्या घरी येण्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खर्चाबरोबरच उत्पन्न वाढल्याने योग्य व्यवस्था होईल. सासरच्या नातेवाईकांबरोबरील मतभेद टाळा. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाऊ शकतो. जास्त कामामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांना जास्त वेळ देऊ शकणार नाही.
कुंभ: पैशाच्या व्यवहारावरून एकमेकांचे नाते बिघडू नका
आज दिवसाच्या सुरुवातीला कामांच्या नियोजनात अडचणी येतील. मात्र दुपारनंतर ग्रहस्थिती अनुकूल राहील. जवळच्या नातेवाईकालाही तिथे जाण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. पैशाच्या व्यवहारावरून एकमेकांचे नाते बिघडू नका. सुव्यवस्था राखण्यासाठी संयम ठेवा. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे योग्य राहिल. व्यवसायात अनुकूल परिस्थितीआहे.
मीन : विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक उपक्रमात यश मिळू शकेल
जीवनशैलीला योग्य दिशा देण्यासाठी सर्जनशील कामांमध्ये वेळ व्यतित करा. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक उपक्रमात यश मिळू शकेल. मालमत्ता किंवा पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
