‘कोव्हॅक्सिन’ दुष्परिणामांबाबतचे संशोधन चुकीचे : ‘आयसीएमआर’
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अॅस्ट्राझेनेका कंपनीने अपवादात्मक परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामाची बाब लंडन न्यायालयात मान्य केल्यानंतर भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या कथित दुष्परिणामांबाबतचा शोधनिबंध बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) जारी केला होता. विशेष म्हणजे, या शोधनिबंधातून ‘आयसीएमआर’चाही (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) हवाला देण्यात आला होता. आता दस्तुरखुद्द ‘आयसीएमआर’ने ‘बीएचयू’चे हे संशोधन खोटे असल्याचा दावा केला असून, ‘बीएचयू’ला त्याबद्दल नोटीसही बजावली आहे.
‘कोव्हॅक्सिन’चेदेखील दुष्परिणाम आहेत, असा एकुणात ‘बीएचयू’च्या या शोधनिबंधाचा सूर होता. आपल्या निष्कर्षाची सत्यता सुस्पष्ट व्हावी म्हणून ‘बीएचयू’च्या संशोधकांनी ‘आयसीएमआर’ही त्याला दुजोरा देत असल्याचे अधोरेखित केले होते. आता ‘आयसीएमआर’ने त्यावर प्रतिक्रिया दिली असून, हा ‘बीएचयू’चा धादांत खोटारडेपणा असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी ‘बीएचयू’ला कायदेशीर नोटीस बजावली आहे. लस घेतलेल्या लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम आढळून आल्याचा ‘बीएचयू’च्या संशोधनातील दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि चुकीच्या तथ्यांवर आधारलेला असल्याचे या नोटिसीत म्हटलेले आहे. ‘आयसीएमआर’ने ‘बीएचयू’ला या संशोधनासाठी कोणतीही तांत्रिक किंवा आर्थिक मदत दिलेली नाही, असेही म्हटले आहे. ‘आयसीएमआर’चे नाव या शोधनिबंधातून काढून टाकावे आणि जाहीर माफी मागावी, अशी मागणी नोटिसीतून करण्यात आली आहे.
‘बीएचयू’त पार पडलेल्या या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांमध्ये ‘कोव्हॅक्सिन’चे दुष्परिणाम दिसून आले. श्वसनाचे संक्रमण, रक्त गोठणे आणि त्वचेशी संबंधित आजार, असे हे दुष्परिणाम होते. ज्यांना अॅलर्जी वा टायफाईड आहे, त्यांना ‘कोव्हॅक्सिन’च्या दुष्परिणामांचा धोका अधिक असल्याचा दावाही या संशोधनातून करण्यात आला होता.


Home महत्वाची बातमी ‘कोव्हॅक्सिन’ दुष्परिणामांबाबतचे संशोधन चुकीचे : ‘आयसीएमआर’
‘कोव्हॅक्सिन’ दुष्परिणामांबाबतचे संशोधन चुकीचे : ‘आयसीएमआर’
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अॅस्ट्राझेनेका कंपनीने अपवादात्मक परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामाची बाब लंडन न्यायालयात मान्य केल्यानंतर भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या कथित दुष्परिणामांबाबतचा शोधनिबंध बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) जारी केला होता. विशेष म्हणजे, या शोधनिबंधातून ‘आयसीएमआर’चाही (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) हवाला देण्यात आला होता. आता दस्तुरखुद्द ‘आयसीएमआर’ने ‘बीएचयू’चे हे संशोधन खोटे असल्याचा दावा केला असून, …