नगरसुल येथे ५९.६५ टक्के मतदान

नगरसुल(जि. नाशिक) Bharat Live News Media वृत्तसेवा– येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक असतांना देखील मतदान चांगले झाले. नगरसुल येथील माजी आमदार कै. जनार्दन देवराम पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी जनार्दन पाटील यांचे भाऊ माजी सरपंच सुनिल देवराम पाटील यांच्या पत्नी गं. भा लीलावती यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी मुलगा परिक्षीत पाटील परिवहन अधिकारी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पाटील यांच्या उत्तम पाटील, दिपक पाटील, माजी सभापती संजय पाटील या तिन्ही मुलांसमवेत मतदान केले. त्याच प्रमाणे नगरसुलचे माजी सरपंच सुभाष निकम, माजी सरपंच सतीश पैठणकर यांनी त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
नगरसूल(ता.येवला)येथील मतदान केंद्रात एकूण झालेले मतदान..
बूथ क्र.90(zp शाळा) :- 795 पैकी- 466
बूथ क्र.91(zp शाळा) :- 790 पैकी -476
बूथ क्र.92(गोल्हेवाडी) :- 1185 पैकी -747
बूथ क्र.93(zp शाळा) :- 912 पैकी- 566
बूथ क्र.94(zpशाळा) :-1057 पैकी -649
बूथ क्र.95 (zpशाळा):-1057 पैकी- 582
बूथ क्र.96 (ग्रामपंचायत बूथ):- 1400 पैकी -802
बूथ क्र.97(zpशाळा) :-1167 पैकी -697
—————————–
8363 पैकी 4985
Total मतदान=59.65 टक्के
हेही वाचा –
Lok Sabha Election 2024 : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४.२२ टक्के मतदानाचा अंदाज
कोल्हापूर: पन्हाळा गडावर वीज पडून नारळाच्या झाडाला आग
Liquid Nitrogen Bengaluru : ‘नायट्रोजन पान’ खाल्ल्याने 12 वर्षीय मुलीच्या पोटात पडले मोठे छिद्र! खाण्यापूर्वी जाणून घ्या तोटे
