लोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यात सरासरी ५६.६८ टक्के मतदान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ४९ मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि.२०) सरासरी ५६.६८ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के तर सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर तिसऱ्या टप्प्यात …

लोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यात सरासरी ५६.६८ टक्के मतदान

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ४९ मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि.२०) सरासरी ५६.६८ टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के तर सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर तिसऱ्या टप्प्यात आसाममध्ये सर्वाधिक मतदान झाले होते. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातही पश्चिम बंगालने सर्वाधिक मतदान होण्याची आघाडी कायम राखली आहे.
देशात १८ व्या लोकसभेसाठी ४९ मतदारसंघांमध्ये मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी (दि.२०) पार पडला. महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडले. त्यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी या मतदारसंघांचा समावेश आहे. देशभरात उत्तर प्रदेश १४, बिहार ५, पश्चिम बंगाल ७, झारखंड ३, ओडिशा ५, जम्मू आणि काश्मीर १, लडाख १ अशा एकूण ४९ जागांसाठी मतदान झाले.
निवडणूक आयोगाने सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी जाहीर केली. मात्र, या टक्केवारीत बदल होऊ शकतो, असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्या सगळ्यांची एकूण स्पष्ट माहिती येण्यास उशीर होऊ शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी,
महाराष्ट्र – ४८.६६ %
उत्तर प्रदेश- ५५.८० %
बिहार – ५२.३५ %
पश्चिम बंगाल – ७३.०० %
झारखंड – ६१.९० %
ओडिशा – ६०.५५ %
जम्मू आणि काश्मीर – ५४.२१ %
लडाख – ६७.१५ %
हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४.२२ टक्के मतदानाचा अंदाज

Dhule Lok Sabha Live Update : धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.92 टक्के मतदान

Loksabha election | लोकसभेचा निकाल ठरविणार जि. प.चा उमेदवार..