वाशिम: बाजार समितीमध्ये पावसामुळे शेतमालाचे नुकसान

वाशिम, Bharat Live News Media वृत्तसेवा: वाशिम शहरात आज तीनच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दुपारच्या वेळी पाऊस झाला. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल ओट्याच्या खाली रस्त्यावर टाकलेला असल्यामुळे माल भिजला.
यावेळी शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. याआधी सुद्धा अनेकदा असेच प्रकार घडलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र या बाबीकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा
वाशिम: मारसूळ येथून शेतमाल चोरणाऱ्या ५ जणांना अटक; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
वाशिम: पातूरमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात; ६ ठार, ४ जण जखमी
JEE Main Result : जेईई मेन सेशन २ मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा डंका; वाशिममधील निलकृष्ण गजरे देशात पहिला
