नांदेड : बाराहाळीत कारची दुचाकीला धडक; युवक गंभीर जखमी

बाराहाळी, पुढारी वृत्तसेवा : दोन मित्र बुलेटवरून जात असताना बुलेट आणि कारची समोरासमोर धडक झाली, या घटनेमध्ये युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जुना बसस्थानक बाराहाळी येथील बिर्याणी दुकानासमोर समोर घडली. माहितीनुसार, शामद बागवान आणि सोहेल शेख (रा. बाराहाळी) हे दोन युवक सोमवारी (दि.२०) दुपारी साडेतीन वाजता दुचाकीवरून (क्र. एमएच १२ एम …

नांदेड : बाराहाळीत कारची दुचाकीला धडक; युवक गंभीर जखमी

बाराहाळी, Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन मित्र बुलेटवरून जात असताना बुलेट आणि कारची समोरासमोर धडक झाली, या घटनेमध्ये युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जुना बसस्थानक बाराहाळी येथील बिर्याणी दुकानासमोर समोर घडली.
माहितीनुसार, शामद बागवान आणि सोहेल शेख (रा. बाराहाळी) हे दोन युवक सोमवारी (दि.२०) दुपारी साडेतीन वाजता दुचाकीवरून (क्र. एमएच १२ एम पी ९६६६) प्रकाशनगरकडे महामार्गवरून जात होते. त्याचवेळी बिर्याणी हाऊससमोर दक्षिणेकडील बाजूने महामार्गावर ट्रकमधून (क्र. एमएच २६ एडी ९९२१) मालवस्तू खाली उतरल्या जात होत्या. ट्रकने महामार्गवरील अतिरिक्त जागा व्यापली होती. यादरम्यान प्रकाशनगरहून भरधाव वेगाने येणा-या कारने (क्र. एमएच १४ ईयु. ०१४२) समोरून येणाऱ्या बुलेटला धडक दिली.
या अपघातात दुचाकी चालक शामद बागवान याला डोक्यास गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला तत्काळ नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याची परिस्थिती ही चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महामार्गावर रस्त्यात लावण्यात आलेला ट्रक हा पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतला आहे.
हेही वाचा : 

ठाणे: कळवा- मुंब्रा येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याचे वृत्त निराधार
ठाणे: कळवा- मुंब्रा येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याचे वृत्त निराधार
परभणी : सुहागन शिवारात ११ फूट लांबीचा मादी अजगर पकडला