बोटावर शाई..चेहऱ्यावर सुरकुत्या..कमल हासन यांच्या ‘Indian 2’…

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ आणि हिंदी चित्रपटांचे सुपरस्टार कमल हासन यांनी आगामी चित्रपट इंडियन २ चे पोस्टर रिलीज केले आहे. आज लोकसभा निवडणूक २०२४ पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान, कमल हासन यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटाचा टायटलसोबत पोस्टर रिलीज केले आहे. रजनीकांत हे प्रभास-दीपिका पदुकोन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कल्कि 2898 AD’ मध्ये …
बोटावर शाई..चेहऱ्यावर सुरकुत्या..कमल हासन यांच्या ‘Indian 2’…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ आणि हिंदी चित्रपटांचे सुपरस्टार कमल हासन यांनी आगामी चित्रपट इंडियन २ चे पोस्टर रिलीज केले आहे. आज लोकसभा निवडणूक २०२४ पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान, कमल हासन यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटाचा टायटलसोबत पोस्टर रिलीज केले आहे.
रजनीकांत हे प्रभास-दीपिका पदुकोन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कल्कि 2898 AD’ मध्ये दिसणार आहेत. तर दुसरीकडे दोन मोठे चित्रपट इंडियन २ आणि ठग लाईफ समाविष्ट आहे.
मतदानविषयी काय म्हणाले कमल हासन?
कमल हासन यांनी एस शंकर दिग्दर्शित चित्रपट ‘हिंदुस्तानी-२’ चा फर्स्ट लूक शेअर करत लोकांना आवाहन केलं आहे की, आपलं मतदान नक्की करा, कमल हासन यांच्या या चित्रपटात ओरिजिनल टायटल ‘इंडियन-२’ आहे, परंतु, हिंदी भाषेत ‘हिंदुस्तानी-२’ नावाने रिलीज केला जाईल. या पोस्टरमध्ये कमल हासन यांना लवकर ओळखता येत नाही. चेहऱ्यावर सुकुत्या, पांढरे केस, कुर्ता आणि मतदानानंतर बोटाला शाई लावलेला पोस्टर लक्षवेधी ठरत आहे.
कमल हासन यांनी फॅन्सना दिला हा खास संदेश
चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत कमल हासन यांनी फॅन्सना आवाहन केलं की, पोलिंग बुथवर जाऊन मतदान करा.
हिंदुस्तानी २ चे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “एक हिंदुस्तानी, एक वोट, एक आवाज, तुम्हीच ते आहात ते जे बदल घडवू शकतात.” ‘इंडियन-२’ मध्ये कमल हासन ‘सेनापती’ची भूमिका अदा करताना दिसणार आहेत.

Ek HINDUSTANI
Ek VOTE
Ek AAWAAZ
Become the change you want! VOTE RESPONSIBLY!#Hindustani2 #Indian2 #Bharateeyudu2 #ZeroTolerance #Indian2On12thJuly #LokSabhaElections2024 pic.twitter.com/CiE7YAlbpP
— Kamal Haasan (@ikamalhaasan) May 20, 2024
हेदेखील वाचा-

Yami Gautam ने दिली गुड न्यूज! चिमुकल्याचे आगमन, नावदेखील खास
हृतिक रोशन ते दीपिकापर्यंत या सेलेब्सनी बजावला मतदानाचा हक्क
KGF डायरेक्टरसोबत Jr NTR चा ड्रॅगन, बर्थडेला मिळाले अनोखे गिफ्ट