सोलापूर : नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी,पक्षी गणना

उत्तर सोलापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा सालाबादप्रमाणे याही वर्षी नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यात (बुधवार) बुद्ध पौर्णिमे दिवशी दि. २२ मे सकाळपासून गुरुवार दि.२३ सकाळ पर्यंत म्हणजे (२४ तास) वन्य प्राणी व पक्षी गणना करण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. वन्यप्राणी गणना करण्याकरिता वनाधिकारी, वनपाल, वनरक्षक, कर्मचारी, निसर्गप्रेमी, पक्षीमित्र यांचा समावेश असणार आहे.
वन्य प्राणी व पक्षी गणनेकरिता ८ ठिकाणी झाडावर झोपड्या व जमिनीवर (मचान) उभारणी केली आहे. तर १४ वॉच टॉवरचा ही उपयोग केला जाणार आहे. नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य अंतर्गत नान्नज, वडाळा, कारंबा, मार्डी, नरोटेवाडी, गंगेवाडी, पिपळा, हिरज व इतर २५ पानवट्यांवर वन्यप्राणी गणना होणार आहे. वन अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीला, निसर्गप्रेमींसह, वाईल्ड लाईफ कंचर वन कर्मचारी व निसर्गप्रेमी वन्य प्राणी गणना करता बसलेल्या ठिकाणी आढळलेल्या वन्य प्राणी व पक्षांची नोंद करण्यात येणार आहे.
कोणत्या प्राण्याची संख्या घटली आहे व वाढली आहे हे प्राणी गणनेत कळणार आहे. वन्यजीव घटना करण्यासाठी बसलेल्या वनाधिकारी, कर्मचारी, पक्षीमित्र, निसर्गप्रेमींना वनविभागाकडून नाष्टा व भोजन देण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी यांनी दिली. या गणनेत वनाधिकारी शुभांगी जावळे, वनपाल जी.डी दाभाडे, संतोष मुंडे, वनरक्षक अशोक फडतरे, विवेकानंद विभुते, सुनील थोरात, ललिता बडे, सत्यशिला कांबळे, सहाय्यक वनरक्षक किशोर कुमार इरळे, चंद्रकांत होनमोरे व इतर सहभागी होणार आहेत.
निरीक्षण करणाऱ्याजवळ असणार ‘हे’ साहित्य
बुद्ध पौर्णिमे दिवशी नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यात वन्यजीव प्राणी गणना करण्यात येणार आहे. वन्यजीव प्राणी निरीक्षणासाठी बसलेल्या व्यक्ती जवळ दुर्बीण, पेन, नोंदवही, नोंदवही फॉर्म, डोक्याला टोपी, पिण्याचे पाणी, साहित्य असणार आहे.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : राज्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ पर्यंत २७.७८ टक्के मतदान
सांगली : ‘सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर अन्याय करून उद्धव ठाकरेंसोबत डील’
Lok Sabha Election : इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान, पं. बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद
