गुजरात ATS ची मोठी कारवाई, ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात एटीएसने दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला आहे. अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चारही दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक आहेत, अशी माहिती गुजरात एटीएस (ATS) ने दिली आहे. गुजरात पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ दहशतवाद्यांना श्रीलंकेतून भारतात मोठा घातपात करण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे …

गुजरात ATS ची मोठी कारवाई, ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गुजरात एटीएसने दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला आहे. अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चारही दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक आहेत, अशी माहिती गुजरात एटीएस (ATS) ने दिली आहे.
गुजरात पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ दहशतवाद्यांना श्रीलंकेतून भारतात मोठा घातपात करण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अहमदाबाद येथून टार्गेटेड ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांना गुजरात एटीएसने जेरबंद केले आहे. हे दहशतवादी पाकिस्तानातून येणाऱ्या त्यांच्या हस्तकांच्या आदेशाची वाट पाहत होते, असेही समोर आले आहे.

Four ISIS terrorists, who are Sri Lankan nationals, arrested at Ahmedabad airport: Gujarat ATS pic.twitter.com/pTHwPlZfnM
— ANI (@ANI) May 20, 2024