बागलाणमध्ये गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर हजेरी

सटाणा (जि. नाशिक) :Bharat Live News Media वृत्तसेवा – धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बागलाण विधानसभा मतदार संघात सोमवारी (दि.२०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली.
गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर लावलेली हजेरी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मतदानासाठी येताना दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली होती. त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी याबाबत हटकले. मात्र पती माजी आमदार संजय चव्हाण यांनी हस्तक्षेप करीत कांद्याच्या माळेसह चव्हाण यांना मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मदत केली. परंतु पुढे गेल्यावर मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अडवून चव्हाण यांना गळ्यातील कांद्याची माळ काढण्यास भाग पाडले. यानंतर माजी आमदार चव्हाण यांनी पती मुलगा व मुली सोबत शहरातील जुनी मराठी शाळा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार चव्हाण यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये कांदा भावाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी होताना गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. मतदानाप्रसंगीही पुन्हा त्यांनी कांद्याची माळ घातल्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
हेही वाचा:
Lok Sabha Election 2024 : राज्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ पर्यंत २७.७८ टक्के मतदान
तेरुंगण तलावातील पाणीपातळी घटली; भीमाशंकरसह भागात तीव्र पाणीटंचाई
ब्रेकिंग : नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव
