INDvsAUS T20: भारताला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ विजयी आघाडी मिळवेल. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या संघात चार बदल केले आहेत. मॅथ्यू शॉर्टच्या जागी ट्रॅव्हिस हेडचे संघात पुनरागमन झाले आहे. तर शॉन अॅबॉटच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ आणि अॅडम झाम्पाच्या जागी केन रिचर्डसन खेळत आहे. स्टीव्ह स्मिथही हा सामना खेळत नसल्याने त्याच्या जागी अॅरॉन हार्डीला संधी मिळाली आहे. दुसरीकडे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या जागी आवेश खान खेळत आहे.
भारताला तिसरा धक्का
भारताला 11व्या षटकात 81 धावांवर तिसरा धक्का बसला. अॅरॉन हार्डीने सूर्यकुमार यादवला यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. सूर्याला 29 चेंडूत 39 धावा करता आल्या. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले.
भारताला दुसरा धक्का
तिसऱ्या षटकात 24 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. केन रिचर्डसनने इशान किशनला स्टॉइनिसकरवी झेलबाद केले. पाच चेंडू खेळणाऱ्या ईशानला खातेही उघडता आले नाही.
भारताला पहिला धक्का
डावाच्या दुसऱ्याच षटकात 14 धावांवर भारताला मोठा धक्का बसला. मोठ्या फटका मारण्याच्या नादात यशस्वी जैस्वालने (6) आपली विकेट गमावली. जेसन बेहरेनडॉर्फचा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक मॅथ्यू वेडपर्यंत पोहोचला.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्धी कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), केन रिचर्डसन, नॅथन एलिस, तन्वीर संघा, जेसन बेहरेनडॉर्फ.
The post INDvsAUS T20: भारताला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ विजयी आघाडी मिळवेल. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी …
The post INDvsAUS T20: भारताला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद appeared first on पुढारी.