रजनीकांत स्टारर ‘लाल सलाम’ यादिवशी हिंदीत पाहता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहेत. मूळचे मराठमोळे असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांना कायम प्रतीक्षा असते. हिंदी रसिकांची हिच आवड ओळखून दक्षिणेकडे गाजलेला ‘लाल सलाम’ हा तमिळ चित्रपट हिंदीत रिलीज करण्याची घोषणा कार्मिक फिल्म्सने केली …
रजनीकांत स्टारर ‘लाल सलाम’ यादिवशी हिंदीत पाहता येणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहेत. मूळचे मराठमोळे असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांना कायम प्रतीक्षा असते. हिंदी रसिकांची हिच आवड ओळखून दक्षिणेकडे गाजलेला ‘लाल सलाम’ हा तमिळ चित्रपट हिंदीत रिलीज करण्याची घोषणा कार्मिक फिल्म्सने केली आहे. मूळ तमिळ भाषेत बनलेल्या या चित्रपटाने दाक्षिणात्य सिनेरसिकांची मनं जिकत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या हिंदी डब ‘लाल सलाम’चा २४ मे रोजी प्रीमियर होणार आहे.

दबंग वृत्तीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एका व्यक्तीची कथा ‘लाल सलाम’मध्ये पाहायला मिळणार आहे. रजनीकांत यांच्या ‘लाल सलाम’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली आहे. तमिळ ‘लाल सलाम’ने बॉक्स ऑफिसवर भव्य यश मिळवत प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली आहे.
अधिक वाचा- 

KGF डायरेक्टरसोबत Jr NTR चा ड्रॅगन, बर्थडेला मिळाले अनोखे गिफ्ट
Aditi Rao Hydari : घटस्फोटानंतर दुसरं लग्न कधी करणार?; ‘हिरामंडी’च्या ‘बिब्बो जान’च्या वॉकची जोरदार चर्चा
कियारा आडवाणीने Cannes मध्ये पसरवली जादू, हाय स्लिट गाऊन…