कापूरहोळ येथे हॉटेलमालकामुळे दुर्घटना टळली..

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : कापूरहोळ (ता. भोर) च्या चौकातील आनंद हॉटेललगत असणार्‍या शेडवर संबंधित व्यावसायिकाचा डिजिटल बोर्ड वादळी वार्‍याने पडणार असल्याचे लक्षात येताच हॉटेलमालकांनी प्रसंगावधान ओळखून ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी (दि. 19) सायंकाळी पुणे-सातारा महामार्ग पट्ट्यात वादळी वार्‍यासह पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान कापूरहोळ (ता. भोर) येथील आनंद हॉटेलशेजारी असणार्‍या त्यांच्या …

कापूरहोळ येथे हॉटेलमालकामुळे दुर्घटना टळली..

नसरापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : कापूरहोळ (ता. भोर) च्या चौकातील आनंद हॉटेललगत असणार्‍या शेडवर संबंधित व्यावसायिकाचा डिजिटल बोर्ड वादळी वार्‍याने पडणार असल्याचे लक्षात येताच हॉटेलमालकांनी प्रसंगावधान ओळखून ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी (दि. 19) सायंकाळी पुणे-सातारा महामार्ग पट्ट्यात वादळी वार्‍यासह पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान कापूरहोळ (ता. भोर) येथील आनंद हॉटेलशेजारी असणार्‍या त्यांच्या दुकानावरील फलक वार्‍याच्या झोतात पडणार असल्याचे लक्षात येताच तेथील ग्राहकांना हॉटेलचे मालक आनंद दळवी व लखन दळवी यांनी आनंद हॉटेलमध्ये घेतले.
घोंगावता जोरदार वार्‍यात थोड्याच वेळात त्यांच्या दुकानाच्या वरील असणारे डिजिटल बोर्ड धीम्यागतीने कोसळले, यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, दळवी बंधूंनी वेल्डरच्या माध्यमातून तातडीने कटिंग करून फलक बाजूला घेतल्याने सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाली नाही.
हॉटेलच्या डिजिटल फलकाचे नुकसान झाल्यापेक्षा वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज आल्याने ग्राहकांना तातडीने दुकानात घेतले होते. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही, याचे समाधान आहे.
– आनंद दळवी, उद्योजक, कापूरहोळ

हेही वाचा

तेरुंगण तलावातील पाणीपातळी घटली; भीमाशंकरसह भागात तीव्र पाणीटंचाई
मतदानादिवशी राहुल गांधी यांनी घेतले हनुमानाचे दर्शन, बूथची पाहणी
गुलटेकडी परिसरात ड्रेनेज लाइन तुंबल्याने घरांत सांडपाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात