Breaking! उद्या ठरणार बारावीच्या विद्यार्थ्यांच भवितव्य; या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.21मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
१.mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकालानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी बुधवार दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून शुल्क भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
सिंहगडावर पर्यटकांचा बोलबाला; दिवसभरात 1717 वाहनांची नोंद; राजगडावरही गर्दी
Health : निरोगी राहायचय, असा असावा आरोग्यदायी आहार
HEALTH : तुम्ही जेवणापूर्वी आणि नंतर चहा-काॅफी पिताय? ICMRचा सल्ला वाचाच
