इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतहेद सापडला

पुढारी ऑनलाईन डेस्क: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टरला अपघात होऊन मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त आज (दि.२० मे) सकाळी समोर आले होते. या (Iran President Ebrahim Raisi) वृत्ताने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र अद्याप या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह सापडले नव्हते. दरम्यान इब्राहिम रईसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांचे मृतहेद सापडल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिल्याचे वृत्त …

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतहेद सापडला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टरला अपघात होऊन मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त आज (दि.२० मे) सकाळी समोर आले होते. या (Iran President Ebrahim Raisi) वृत्ताने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र अद्याप या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह सापडले नव्हते. दरम्यान इब्राहिम रईसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांचे मृतहेद सापडल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

#WATCH | Iran President Ebrahim Raisi, Foreign Minister died in a helicopter crash due to heavy fog in mountain terrain; Mortal remains of the deceased being retrieved
(Source: Screenshot from video shared by Iran’s Press TV) pic.twitter.com/gTWsmzkkCu
— ANI (@ANI) May 20, 2024

दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटना
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी ( दि. १९) अपघात झाला होता. डोंगराळ भागात दाट धुक्यामुळे ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्याचेही वृत्त माध्यमांनी दिली आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष डोंगराळ भागात सापडले असून ते पूर्णतः जळून खाक झाले आहे. तर हेलिकॉप्टरच्या अपघातस्थळी कोणीही वाचलेले सापडलेले नाही, अशी पुष्टी इराणच्या स्टेट मीडियाने सोमवारी केली होती.
हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्षांसह एकूण ९ जण
सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, “हेलिकॉप्टरमधील कोणीही वाचल्याचे दिसून आलेले नाही.” हेलिकॉप्टरमध्ये एकूण ९ लोक होते. त्यात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, अब्दुल्लाहियान, तीन इराणी अधिकारी, एक इमाम आणि सुरक्षा दलाच्या सदस्यांचा समावेश होता, असे वृत्त CNN ने इराणी मीडियाचा हवाल्याने दिले आहे. तीन अधिकाऱ्यांमध्ये एक पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमाती होते.
दिल्लीतील इराण दूतावासाचा ध्वज अर्ध्यावर
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी, परराष्ट्र मंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासाने आपला ध्वज अर्ध्यावर उतरवला आहे.

The Iranian Embassy in Delhi has lowered its flag to half-mast following the death of Iranian President Ebrahim Raisi, Foreign Minister and other high-ranking officials in a helicopter crash. pic.twitter.com/3hL35ShnGe
— ANI (@ANI) May 20, 2024

हेही वाचा:

रईसींचा अपघाती मृत्‍यू, इराणच्‍या राष्ट्राध्यक्षपदी कोण होणार विराजमान?
Iran President : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Ebrahim Raisi: विद्यार्थी चळवळ ते सर्वोच्‍च नेत्‍याचे वारसदार…जाणून घ्‍या इराणच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांविषयी