रईसींचा अपघाती मृत्‍यू, इराणच्‍या राष्ट्राध्यक्षपदी कोण होणार विराजमान?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतील, असे वृत्त ‘तेहरान टाइम्स’ने दिले आहे. इराणची राज्‍य घटना काय सांगते? इराणने १९७९ मध्‍ये स्वीकारल्या गेलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या राज्यघटनेच्‍या पहिल्या आवृत्तीच्या कलम 130 आणि 131 नुसार, “देशाचा राष्ट्राध्यक्ष बडतर्फी, राजीनामा, अनुपस्थिती, आजारपणामुळे …

रईसींचा अपघाती मृत्‍यू, इराणच्‍या राष्ट्राध्यक्षपदी कोण होणार विराजमान?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतील, असे वृत्त ‘तेहरान टाइम्स’ने दिले आहे.
इराणची राज्‍य घटना काय सांगते?
इराणने १९७९ मध्‍ये स्वीकारल्या गेलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या राज्यघटनेच्‍या पहिल्या आवृत्तीच्या कलम 130 आणि 131 नुसार, “देशाचा राष्ट्राध्यक्ष बडतर्फी, राजीनामा, अनुपस्थिती, आजारपणामुळे आपली कायदेशीर कर्तव्ये पार पाडू शकत नसेल किंवा मृत्यू झाला तर उपराष्ट्रपती आपले कर्तव्य बजावतील. इस्लामिक क्रांतीच्या नेत्याची मान्यता मिळाल्यानंतर राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या जबाबदाऱ्या पहिल्या उपराष्ट्रपतीकडे हस्तांतरित केल्या जातील. तसेच यानंतर ५० दिवसांमध्‍ये नवीन राष्‍ट्रपती निवडणूक होईल.” या कायद्‍यानुसार आता इराणचे उपराष्‍ट्रपती मोहम्मद मोखबर हे राष्‍ट्राध्‍यक्षपदी विराजमान होणार आहेत.
कोण आहेत मोहम्मद मोखबर ?
मोखबर यांचा जन्‍म १ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. ते राईसी यांच्याप्रमाणेच इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या जवळचे मानले जातात.२०२१ मध्ये इब्राहिम रईसी राष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर मोखबर हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले हाेते. ऑक्टोबरमध्ये मॉस्कोला भेट देणाऱ्या समितीमध्‍ये त्‍यांचा सहभाग हाेता. मोखबर यांनी देशातील आर्थिक निधीचे प्रमुखपदीही काम पाहिले आहे.
राष्‍ट्राध्‍यक्षांचा हेलिकॉप्‍टर अपघातात मृत्‍यू
इराणचे राष्ट्राध्यक्ष राईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुलाहियानी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पूर्व अझरबैजान प्रांतातील घनदाट जंगलात कोसळले. हेलिकॉप्टरच्या प्रवाशांमध्ये श्री रायसी, श्री अब्दुल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमाती आणि पूर्व अझरबैजान प्रांतातील इस्लामिक क्रांतीच्या नेत्याचे प्रतिनिधी अयातुल्ला मोहम्मद अली अले-हाशेम आणि इतर अनेकांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्ष रायसी रविवारी पहाटे पूर्व अझरबैजान प्रांतात गेले होते, जेथे त्यांनी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन केले. कार्यक्रम आटोपून परतत असताना परिसरात दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्‍याचे सरकारी सूत्रांनी म्‍हटले आहे.

#BREAKING
President #Raisi‘s first vice president, Mohammad Mokhber, will serve as Iran’s president for 50 days before the new presidential election, which will be organized by a special council. pic.twitter.com/FuRyUnwZ1w
— Tehran Times (@TehranTimes79) May 20, 2024

हेही वाचा : 

Iran President Ebrahim Raisi: इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघातात मृत्यू; मृतहेद सापडले
Iran President : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Ebrahim Raisi: विद्यार्थी चळवळ ते सर्वोच्‍च नेत्‍याचे वारसदार…जाणून घ्‍या इराणच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांविषयी