विद्यार्थी चळवळ ते सर्वोच्‍च नेत्‍याचे वारसदार…जाणून घ्‍या इराणच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टरला अपघात मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने प्रेस टीव्हीने दिले आहे. या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. ६३ वर्षीय इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे कट्टरपंथी नेते आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे शिष्य …

विद्यार्थी चळवळ ते सर्वोच्‍च नेत्‍याचे वारसदार…जाणून घ्‍या इराणच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांविषयी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टरला अपघात मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने प्रेस टीव्हीने दिले आहे. या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.
६३ वर्षीय इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे कट्टरपंथी नेते आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे शिष्य आणि वारसदार म्‍हणूनही त्‍यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घेवूया त्‍यांचा जीवन प्रवास…
धर्म आणि राजकारणाकडे कल
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म १९६० मध्‍ये ईशान्य इराणमधील मशहद शहरात झाला. त्‍यांचे वडील मौलवी होते; पण रुईसी पाच वर्षांचा असताना त्‍यांच्‍या वडिलांचे निधन झाले. रईसी यांचा सुरुवातीपासूनच धर्म आणि राजकारणाकडे कल होता. कोम शहरात असलेल्या शिया संस्थेत त्‍यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थीदशेत त्यांनी मोहम्मद रझा शाह यांच्या विरोधात पाश्चात्य देशांनी पाठिंबा दिलेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतला. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीच्या माध्यमातून शाह यांना सत्तेवरून हटवले. विद्यार्थीदशेतच ते मोहम्मद रजा शाह यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते.
सरकारी वकील ते इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख
केवळ वयाच्‍या विसाव्‍या वर्षी त्‍यांची तेहरान नजीकच्‍या काराज येथे सरकार वकील पदी नियुक्‍ती झाली. इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर त्यांनी न्यायव्यवस्थेत काम करण्यास सुरुवात केली. इराणमधीलअनेक शहरांमध्ये वकील म्हणून काम केले. यावेळी ते इराण प्रजासत्ताकचे संस्थापक अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्याकडून प्रशिक्षण घेत होते. खोमेनी 1981 मध्ये इराणचे अध्यक्ष झाले. तेव्‍हा राईसी २५ वर्षांचे होते)  १९८९ ते १९९४ या काळात ते तेहरानचे अभियोजक जनरल (सरकारी वकील)  होते. २००४ मध्‍ये त्‍यांनी इराणच्‍या न्‍यायिक प्राधिकरणाच्‍या उपप्रमुख पदी निवड झाली. २०१४ मध्‍ये ते इराणचे प्रॉसिक्युटर जनरल बनले. इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या राईसी हे एक कट्टरतावादी नेते आणि देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे वारसदार म्‍हणून ओळखले जातात.
जून 2021 मध्ये ते इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. निवडणूक प्रचारादरम्यान, रौहानी राजवटीत निर्माण झालेल्या भ्रष्टाचार आणि आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी रईसी यांनी स्वत: ला सर्वोत्तम पर्याय म्हणून प्रचार केला. त्यांना ‘हुज्जातुल इस्लाम’ म्हणजेच ‘इस्लामचा पुरावा’ ही धार्मिक पदवीही देण्यात आली आहे.
इराणच्‍या ‘डेथ कमिटी’त सहभाग
1988 मध्ये ‘डेथ कमिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्तचर न्यायाधिकरणात त्‍यांचा सहभाग असल्‍याचे सांगितले जाते. या न्यायाधिकरणांनी हजारो राजकीय कैद्यांवर खटला चालवला जातो. यातील बहुतांश राजकीय कैदी हे डाव्या आणि विरोधी गटातील मुजाहिदीन-ए-खलका (MEK) किंवा इराणमधील पीपल्स मुजाहेदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराण (PMOI) चे सदस्य होते. या न्यायाधिकरणांद्वारे एकूण किती राजकीय कैद्यांना फाशी देण्यात आली हे माहीत नाही, परंतु मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे की त्यात अंदाजे 5,000 पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. मात्र राईसी यांनी या प्रकरणातील आपली भूमिका सातत्याने नाकारली आहे, परंतु इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या फतव्यानुसार ही शिक्षा “योग्य” असल्याचे समर्थन ते करत असत.
हेही वाचा :

Iran President Ebrahim Raisi | इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह ९ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
Iran President : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Ebrahim Raisi: विद्यार्थी चळवळ ते सर्वोच्‍च नेत्‍याचे वारसदार…जाणून घ्‍या इराणच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांविषयी