राज्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत १५.९३ टक्के मतदान

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदान आज (दि.२०) सकाळी ७ वा. पासून सूरु आहे. पाचव्या टप्प्यात राज्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
१३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे – १७.३८ टक्के
दिंडोरी – १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर – १८.६० टक्के
भिवंडी – १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के
सकाळी ९ पर्यंत ६.३३ टक्के मतदान
राज्यात सकाळी संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी ९ पर्यंत ६.३३ टक्के मतदान झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम, ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत असे दिग्गज नशीब आजमावत आहेत. मुंबईतील सर्वच सहाही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदार मतदान केंद्रावर येईल, यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
हेही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
अंतरवाली सराटीत ४ जूनपासून बेमुदत उपोषणाचा जरांगेंचा निर्धार
