जिंदगी जिंदाबाद! उत्तरकाशी बोगद्यातून पहिल्या ५ कामगारांना बाहेर काढण्यात यश

पुढारी ऑनलाईन : उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहचण्यास आज अखेर मंगळवारी (दि.२८) १७ व्या दिवशी बचावपथकाला यश आले. आता कामगारांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे. हे बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात आले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ५ कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेमधून तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. अखेरच्या क्षणी एनडीआरएफ पथकाने बोगद्यात … The post जिंदगी जिंदाबाद! उत्तरकाशी बोगद्यातून पहिल्या ५ कामगारांना बाहेर काढण्यात यश appeared first on पुढारी.
#image_title

जिंदगी जिंदाबाद! उत्तरकाशी बोगद्यातून पहिल्या ५ कामगारांना बाहेर काढण्यात यश

पुढारी ऑनलाईन : उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहचण्यास आज अखेर मंगळवारी (दि.२८) १७ व्या दिवशी बचावपथकाला यश आले. आता कामगारांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे. हे बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात आले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ५ कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेमधून तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. अखेरच्या क्षणी एनडीआरएफ पथकाने बोगद्यात प्रवेश केला आणि कामगारांना मदतीचा हात दिला. बोगद्याच्या ठिकाणी ३० खाटांची तात्पुरती वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आली. तसेच सिल्क्यारा बोगद्यामधून कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिन्यलिसौर हवाईपट्टीवर चिनूक हेलिकॉप्टर तैनात ठेवण्यात आले होते. आजतक या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनंतर या बचावकार्याबाबत माहिती मिळाली आहे.
उत्तराखंड आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफ, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे आणि इतर सरकारी यंत्रणांचा बचावकार्यात समावेश आहे. विशेष म्हणजे बचावकार्यात उत्तरखंड प्रशासनाने कोणतेही कसर ठेवली नाही. (Uttarkashi tunnel rescue) आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ ख्रिस कूपर, अर्नोल्ड डिक्स यांनीही या बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
संबंधित बातम्या 

Uttarkashi tunnel rescue : बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण

Uttarkashi Tunnel Rescue: बोगदा दुर्घटना; व्हर्टिकल खोदकामाला वेग, लष्करही तैनात

Uttarkashi Tunnel rescue operation: आता मनोधैर्य राखण्‍यासाठी ‘लढाई’! ४१ कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue: As rescue operation enters final stage, “I’m very very happy”, says kin of a worker who is trapped inside Silkyara tunnel pic.twitter.com/vvBA3XHwS5
— ANI (@ANI) November 28, 2023

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue: As rescue operation enters final stage, “I’m very very happy”, says kin of a worker who is trapped inside Silkyara tunnel pic.twitter.com/vvBA3XHwS5
— ANI (@ANI) November 28, 2023

बाबा बौख नागजींची अपार कृपा, देशवासीयांची प्रार्थना आणि बचावकार्यातील सर्व बचावदलांच्या अथक परिश्रमामुळे कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
– पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री उत्तराखंड
प्रत्येकजण खूप उत्साही आहे. आम्ही व्हर्टिकल ड्रिलिंग थांबवले आणि मॅन्युअल ड्रिलिंगवर लक्ष केंद्रित केले.
ख्रिस कूपर, बोगदा तज्ज्ञ
‘मी बचावकार्य जवळून अनुभवले. मला आता आनंद वाटत आहे.
अर्नोल्ड डिक्स, बोगदा तज्ज्ञ

बाबा बौख नाग जी की असीम कृपा, करोड़ों देशवासियों की प्रार्थना एवं रेस्क्यू ऑपरेशन में लगे सभी बचाव दलों के अथक परिश्रम के फलस्वरूप श्रमिकों को बाहर निकालने के लिए टनल में पाइप डालने का कार्य पूरा हो चुका है। शीघ्र ही सभी श्रमिक भाइयों को बाहर निकाल लिया जाएगा।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 28, 2023

उपचारासाठी ४१ खाटांची व्यवस्था
उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर अडकलेल्या कामगारांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांच्यावरील उपचारासाठी चिन्यालीसौर येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये ४१ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बोगद्याचे कामकाज सुरू असताना काही भाग कोसळल्याने ऐन दिवाळीत ४१ मजूर बोगद्यात अडकले होते. गेल्या आठवड्यात बचावकार्यात विघ्न आल्याने नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र हवाई दल, ओएनजीसी, डीआरडीओसह अन्य सरकारी यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून बचावकार्य अचूकपणे केले. (Uttarakhand Tunnel Collapse News)
बोगद्यातील खडक आणि ढिगार्‍यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. अत्याधुनिक ड्रिलिंग मशिन्सद्वारे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे बुधवारपर्यंत ड्रिलिंगचे काम ५० मीटरपर्यंत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर युद्धपातळीवर ड्रिलिंगचे उर्वरित कामकाज पूर्ण करण्यात आले. (Uttarkashi Tunnel Collapse)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून वेळोवेळी बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांचे मजुरांच्या सुटकेकडे लक्ष लागले होते. त्यामुळे शासकीय यंत्रणा गतिमान राहिल्या. (Uttarkashi Tunnel Rescue)
Uttarkashi Tunnel Rescue : युद्ध पातळीवर बचावकार्य…
१२ नोव्‍हेंबर २०२३ हा देशभरात दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अचानक दरड कोसळली. तिथे काम करणारे ४१ मजूर आत अडकले. ढिगारा एवढा मोठा होता की, गेल्या काही दिवसांपासून कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू राहिले. बोगद्यात रात्रंदिवस पथकांनी बचावकार्य केले.
जाणून घेवूया ४१ मजुरांसाठी राबविण्‍यात आलेल्‍या बचावकार्याविषयी…
सुरुवातीला बोगद्यात अडकलेल्या कामगारांची संख्या ३६ असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांची संख्या ४० असल्याचे सांगण्यात आले. एका आठवड्यानंतर, कंपनीने सांगितले की, ४१ मजूर बोगद्यात अडकलेले आहेत. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ,एनएच आयडीसीएल,उत्तराखंड पोलिस, एसजीव्‍हीएनएल, आरव्‍हीएनएल, लार्सन अँड टुब्रो, टीएचडीसी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा प्रशासन, ओएनजीसी, आयटीबीपी, उत्तराखंड पाटबंधारे विभाग, डीआरडीओ,, परिवहन मंत्रालय, होमगार्ड बचाव कार्यात सहभागी झाले होते.
बचावकार्यासाठी सहा योजनांवर काम केले गले. बोगदा प्रवेशव्‍दारातून ऑगर मशीनने ड्रिलिंग करणे, बोगद्याच्या टोकापासून ड्रिलिंग करणे, बोगद्याच्या वरपासून उजवीकडे आणि डाव्या बाजूने ड्रिलिंग करणे, बोगद्याच्या वरच्या बाजूने ड्रिलिंग करणे आदींचा समावेश होता.
तज्ज्ञांच्या पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. डीआरडीओचे दोन ७० किलो वजनाचे रोबोट येथे पोहोचले होते, परंतु वालुकामय मातीमुळे त्‍याचा वापर करता आला नाही. ड्रोनच्या साह्याने छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोही अपयशी ठरला. (Uttarkashi rescue operations)
इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अर्नोल्ड डिक्स यांनी कामगारांच्या सुटकेसाठी आपले कौशल्य पणाला लावले. याशिवाय हिमाचलमधील बोगद्या दुर्घटनेत कामगारांना वाचवणाऱ्या टीमलाही येथे पाचारण करण्यात आले होते.
नवव्या दिवशी सायंकाळी उशिरा कामगारांना खाण्यासाठी खिचडी आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर या वस्तू पाईपद्वारे पाठवण्यात आल्या.
दहाव्या दिवशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा पोहोचवण्यात आला. बचाव कर्मचाऱ्यांनी वॉकीटॉकीद्वारे अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधला. काही मजुरांनी पोटदुखीची तक्रार केली, त्यासाठी औषध पाठवण्‍यात आली. काही आवश्यक कपडे, ब्रश आणि पेस्टही कामगारांना पाठवण्यात आल्या. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने कामगारांशी बोलण्यासाठी ऑडिओ कम्युनिकेशन सुरू ठेवले. मायक्रोफोन आणि स्पीकर आत पाठवले गेले.
ऑगर मशीन नादुरुस्त
बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. दरम्यान, उत्तरकाशी बोगद्यातील बचाव मोहिमेत शुक्रवारी (दि.२५) अमेरिकन ऑगर ड्रिलिंग मशीन मेटल गर्डरला धडकल्यानंतर ते नादुरुस्त झाले. या मशिनचे ब्लेड खराब झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले आहे की, बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके मॅन्युअल ड्रिलिंग करतील.
“सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ऑगर मशीनला कापण्यासाठी प्लाझ्मा कटरचा वापर केला जाईल. हे कटर हैदराबादहून एअरलिफ्ट केले जात आहे आणि आज रात्री ते डेहराडूनला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते (कटर) रात्री उशिरापर्यंत सिल्क्यारा येथे पोहोचेल. त्यानंतर उद्या सकाळपासून मॅन्युअल ड्रिलिंग सुरू होईल,” असे मुख्यमंत्री धामी शनिवारी (दि. २५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांनी बोगद्याच्या ठिकाणी तात्पुरते कार्यालयही उभे केले होते.
हे ही वाचा :

बोगद्यातील मजुरांची कोणत्याही क्षणी सुटका; ड्रिलिंगचे काम ५० मीटरपर्यंत पूर्ण
बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
दहाव्या दिवशी बोगद्यात पोहोचला कॅमेरा, ४१ कामगारांचा व्हिडिओ आला समोर

The post जिंदगी जिंदाबाद! उत्तरकाशी बोगद्यातून पहिल्या ५ कामगारांना बाहेर काढण्यात यश appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहचण्यास आज अखेर मंगळवारी (दि.२८) १७ व्या दिवशी बचावपथकाला यश आले. आता कामगारांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे. हे बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात आले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ५ कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेमधून तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. अखेरच्या क्षणी एनडीआरएफ पथकाने बोगद्यात …

The post जिंदगी जिंदाबाद! उत्तरकाशी बोगद्यातून पहिल्या ५ कामगारांना बाहेर काढण्यात यश appeared first on पुढारी.

Go to Source