यादीतील नावे शोधतांना मतदारांच्या नाकीनऊ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – शहरात काही ठिकाणी मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. तर  गंगापूर रोड, कॉलेज रोड, के. बी. टी. महाविद्यालय येथे मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असून काही ठिकाणी मतदार यादीतील क्रमांक शोधताना मतदारांच्या नाकीनऊ येत आहे. तर मतदानासाठी कमीत कमी पाऊण तास रांगेत थांबावे लागत असल्याचे सांगण्यात येत …

यादीतील नावे शोधतांना मतदारांच्या नाकीनऊ

नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क – शहरात काही ठिकाणी मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. तर  गंगापूर रोड, कॉलेज रोड, के. बी. टी. महाविद्यालय येथे मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असून काही ठिकाणी मतदार यादीतील क्रमांक शोधताना मतदारांच्या नाकीनऊ येत आहे. तर मतदानासाठी कमीत कमी पाऊण तास रांगेत थांबावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील काही मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याने काहींची धावपळ होत आहे. तर काही मतदार हयात असूनही त्यांची नावेच गायब असल्याने त्यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नाराजीचा सूर मिळत आहे. तर यंदा ग्रामीण भागातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिंडोरी ; देवळा तालुक्यातील खर्डे येथे सकाळी 9 वाजता मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (छाया : सोमनाथ जगताप)
१०८ मॉडेल पोलिंग बूथ
जिल्ह्यात १०८ मॉडेल पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मतदारसंघनिहाय विशेष थीमवर दोन पोलिंग बूथ, महिला विशेष दोन, दिव्यांग विशेष एक अशा एकूण १०८ पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच मॉडेल पोलिंग बूथवर विविध थीमवर सुशोभीकरण केले जाणार आहे, सेल्फी पॉइंट, रांगोळी सजावट, मतदान जनजागृतीपर बॅनर्स असणार आहेत.
नाशिक : खर्डे, ता देवळा सकाळी 9 .30 वाजता चारही बुथवर मतदारांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (छाया : सोमनाथ जगताप)
रनर्स देणार अपडेट
जिल्ह्यातील दुर्गम भागातील १०३ मतदान केंद्रांच्या क्षेत्रात मोबाइल नेटवर्क नसल्याने तेथे वायरलेस यंत्रणा प्रशासनाने उभारली आहे. त्यामध्ये नाशिक मतदारसंघातील १९ व दिंडोरीतील ६२ केंद्रांचा समावेश आहे. ही सर्व केंद्र त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्याच्या हद्दीत आहेत. या सर्व ठिकाणी ‘रनर्स’ची नेमणूक केली गेली आहे. हे रनर्स मतदान केंद्रांवरील प्रत्येक दोन तासांची मतदानाची अपडेट माहिती तालुकापर्यंत पोहोचविणार आहेत
आता यादीत नाव शोधणे सोपे…
मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधण्यासाठी निरनिराळे पर्याय उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगाचे मतदार पोर्टल https://voters.eci.gov.in/ वर मतदाराने प्रथम राज्याचे नाव, स्वत:चे पहिले नाव, वय किंवा जन्मतारीख व लिंग ही अनिवार्य माहिती नमूद केल्यावर मतदार त्यांचे नाव मतदारयादीत शोधू शकतात. तसेच Voter Helpline App (VHA) हे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करून त्यात search your Name in Electoral Roll या पर्यायावर क्लिक करून त्यावर उपलब्ध होणाऱ्या चार उपपर्यायांच्या आधारे आपले नाव व मतदान केंद्राचा तपशील मतदार शोधू शकतात.
देवळा येथे ९६ वर्षीय तुळसाबाई आहेर, या वृद्ध आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. (छाया : सोमनाथ जगताप)