‘फीलिंग गुड! पहिल्यांदा मतदान केल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने पहिल्यांदाचा मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मतदान केल्यानंतर ‘खूप छान वाटत आहे’…आहे असे म्हटले. भारतीय नागरिकत्व घेतल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने सोमवारी (20 मे) लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान केले. मुंबईत मतदान केल्यानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणाला, …
‘फीलिंग गुड! पहिल्यांदा मतदान केल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने पहिल्यांदाचा मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मतदान केल्यानंतर ‘खूप छान वाटत आहे’…आहे असे म्हटले.
भारतीय नागरिकत्व घेतल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने सोमवारी (20 मे) लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान केले. मुंबईत मतदान केल्यानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणाला, “भारताने विकसित आणि मजबूत राहावे अशी माझी इच्छा आहे. माझे मत यावरच आधारित आहे. मतदान केंद्रावर मी वैयक्तिकरित्या सुमारे 500-600 लोक पाहिले आहेत. त्यांचेदेखील मत असेच आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जे काही होईल ते चांगलेच होईल, असे मत अक्षय कुमारने व्यक्त केले.
Akshay Kumar : ऑगस्ट, २०२३ मध्ये अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्त्व
अक्षय कुमारला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. याआधी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. सोशल मीडियावर नागरिकत्व प्रमाणपत्र शेअर करताना अक्षय कुमारने (Akshay Kumar) लिहिले होते की, हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्थानी आहेत.
आज पाचव्या टप्प्यातील मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ज्या ८ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५व्या टप्प्यात मतदान होत आहे त्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
अद्याप मतदानाचे 2 टप्पे बाकी, 4 जूनला निकाल
लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी आणि चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान झाले आहे. यानंतर आज 20 मे रोजी मतदानाचा पाचवा टप्पा पार पडत आहे. तर उर्वरित टप्पे 25 मे आणि 1 जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.
हे ही वाचा:

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील ४९ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.२८ टक्के मतदान
Lok Sabha Elections 2024 : १ कोटी मतदार ठरविणार मुंबईतील ११६ उमेदवारांचे भवितव्य