अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ’द फेदरवेट’ चित्रपटाची निर्मिती : रॉबर्ट कोलोनी
दीपक जाधव
पणजी : इफ्फीमध्ये ’द फेदरवेट’ चित्रपट प्रदर्शित करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. अनेक वर्षांच्या संशोधन आणि कठोर परिश्रमानंतर हा चित्रपट तयार केला आहे, असे ’द फेदरवेट’ चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट कोलोनी म्हणाले. महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट म्हणून मंगळवारी (दि.२८) 54 व्या इफ्फीमध्ये या अमेरिकन चित्रपटाचा आशिया प्रीमियर झाला. IFFI 2023 Goa
पत्र सूचना कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना, चित्रपट निर्माते रॉबर्ट कोलोनी म्हणाले, हा चित्रपट इटालियन-अमेरिकन बॉक्सर विली पेप याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. ज्याचा बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक लढतींचा विक्रम आहे. त्याचा कारकिर्दीत 241 फाईट्सचा विक्रम आहे. दिवंगत बॉक्सरच्या गावी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यापासून ते त्यांचे बॉक्सिंग ग्लोव्हज वापरण्यापर्यंत, हा चित्रपट सत्य आणि काल्पनिकता, वास्तव आणि सिनेमा यांच्यातील दोलायमानता आहे, असे दिग्दर्शकाने स्पष्ट केले. IFFI 2023 Goa
कोलोनी म्हणाले, विली पेप यांचा गतिमान जीवनाचा इतिहास, क्रीडा नाट्यातील उत्सुकता आणि मानवी नाट्याचे वास्तव यामुळे माहितीपूर्ण, मनोरंजक आणि वास्तव कथा सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय मंचावर चित्रपटाद्वारे संवाद साधणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
निर्मात्या बेनेट इलियॉट म्हणाल्या, दिवंगत बॉक्सरच्या गावी चित्रीकरण करणे आणि स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळणे आनंददायक होते. त्यांच्या आत्म्याची उपस्थिती नेहमीच आम्हाला जाणवत होती. आम्ही स्वतंत्र चित्रपट म्हणून या प्रकल्पासाठी खूप मेहनत केली आहे आणि स्वप्ने रंगवली आहेत.
अभिनेता जेम्स मॅडिओ म्हणाले की, विली पेप यांचे जीवन अनुभवणे आणि त्यांची भूमिका साकारणे हा एक अभिनेता म्हणून कल्पने पलिकडचा अनुभव होता. बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणे आणि हा स्वतंत्र चित्रपट बनवणे हा एक चमत्कार आहे. बॉक्सर विली पेप यांच्या भूमिकेत शिरण्यासाठी आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी इतकी वर्षे समर्पित वृत्तीने केलेले संशोधन मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक होते. मात्र त्याच वेळी मुक्त करणारे होते. हा अनेक वर्षांच्या संशोधनाचा परिणाम आहे. आणि आमच्या चित्रपटाने 54 व्या इफ्फीचा समारोप होणे, हा आमच्यासाठी सन्मान आहे, असे लेखक स्टीव्ह लॉफ यांनी सांगितले.
हेही वाचा
IFFI 2023 Goa :’एन्डलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार; ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार
IFFI 2023 Goa : गोल्डन पिकॉक पुरस्काराचे नामांकन ‘कांतारा’ टीमसाठी अभिमानास्पद : ऋषभ शेट्टी
IFFI 2023 : कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच अभिनय क्षेत्रात-अभिनेत्री शेफाली नाईक
The post अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ’द फेदरवेट’ चित्रपटाची निर्मिती : रॉबर्ट कोलोनी appeared first on पुढारी.
पणजी : इफ्फीमध्ये ’द फेदरवेट’ चित्रपट प्रदर्शित करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. अनेक वर्षांच्या संशोधन आणि कठोर परिश्रमानंतर हा चित्रपट तयार केला आहे, असे ’द फेदरवेट’ चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट कोलोनी म्हणाले. महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट म्हणून मंगळवारी (दि.२८) 54 व्या इफ्फीमध्ये या अमेरिकन चित्रपटाचा आशिया प्रीमियर झाला. IFFI 2023 Goa पत्र सूचना कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार …
The post अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ’द फेदरवेट’ चित्रपटाची निर्मिती : रॉबर्ट कोलोनी appeared first on पुढारी.