पाचव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.२८ टक्के मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील देशातील ४९ जागांवर आज मतदान सुरू आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात १०.२८ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्र ६.३३ टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये ८.८६ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ७.६३ टक्के, झारखंड ११.६८ टक्के, लडाख १०.५१ टक्के, ओडिशा ६.८७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १५.३५ टक्के …

पाचव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.२८ टक्के मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील देशातील ४९ जागांवर आज मतदान सुरू आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात १०.२८ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्र ६.३३ टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये ८.८६ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ७.६३ टक्के, झारखंड ११.६८ टक्के, लडाख १०.५१ टक्के, ओडिशा ६.८७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १५.३५ टक्के मतदान झाले आहे.

#LokSabhaElections2024 | 10.28% voter turnout recorded till 9 am, in the fifth phase of elections.
Bihar 8.86%
Jammu & Kashmir 7.63%
Jharkhand 11.68%
Ladakh 10.51%
Maharashtra 6.33%
Odisha 6.87%
West Bengal 15.35% pic.twitter.com/bNP5RqOg7d
— ANI (@ANI) May 20, 2024

राज्यात सकाळी संथगतीने मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. महामुंबईतील नऊ जागांसह १३ मतदारसंघांत होणार्‍या मतदानातून दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. राज्यात सकाळी संथगतीने मतदान सुरू आहे. सकाळी ९ पर्यंत ६.३३ टक्के मतदान झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम, ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत असे दिग्गज नशीब आजमावत आहेत. मुंबईतील सर्वच सहाही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदार मतदान केंद्रावर येईल, यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
हेही वाचा : 

पाचव्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदान सुरू
एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद देण्यास आमची हरकत नव्हती : शरद पवार