Loksabha election | मतदानावेळी पैसे वाटप करणार्‍याविरोधात गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा मतदानावेळी दि. 7 मे रोजी बारामतीत पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला होता. प्रशासनाने दोन आठवड्याने त्याची दखल घेत आता अज्ञाताविरोधात लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात केशव तुकाराम जोरी (रा. हरिकृपानगर, देशपांडे इस्टेट बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, दि. 7 …

Loksabha election | मतदानावेळी पैसे वाटप करणार्‍याविरोधात गुन्हा

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा मतदानावेळी दि. 7 मे रोजी बारामतीत पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला होता. प्रशासनाने दोन आठवड्याने त्याची दखल घेत आता अज्ञाताविरोधात लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात केशव तुकाराम जोरी (रा. हरिकृपानगर, देशपांडे इस्टेट बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, दि. 7 मे रोजी बारामती शहरातील मतदान केंद्र क्र. 167 बारामती नगरपरिषद निलम पॅलेसजवळील अंगणवाडी साठेनगर परिसरात हा गुन्हा घडला.
यातील फिर्यादी हे जिल्हा परिषद उपविभाग जलसंपदाच्या पंचायत समिती बारामती येथे शाखा अभियंता, बारामतीचे तहसीलदार यांनी फिर्यादी यांना बोलावून घेऊन कळविले की, मतदान प्रक्रियादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडीओ टि्वटरवर आला आहे, त्यानुसार फिर्यादीने ट्वीटरवरील  http:///twitter.com/RRP Speaks/status/17877796541467 40343 या लिंकवर जाऊन पाहिले असता त्या व्हिडीओमध्ये अज्ञात संशयित हा मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे दिसून आले. या व्हिडीओच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा

संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारने दोन आयटी इंजिनिअरला चिरडले
Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदान सुरू
एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद देण्यास आमची हरकत नव्हती : शरद पवार