पाचव्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदान सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह आठ राज्यांतील ४९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ८२ उमेदवार म्हणजेच १२ टक्के महिला उमेदवार राजकीय पटलावर आपले नशीब आजमावत आहेत. Voting for the fifth phase of #LokSabhaElections2024 begins. …

पाचव्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदान सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह आठ राज्यांतील ४९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ८२ उमेदवार म्हणजेच १२ टक्के महिला उमेदवार राजकीय पटलावर आपले नशीब आजमावत आहेत.

Voting for the fifth phase of #LokSabhaElections2024 begins. Polling being held in 49 constituencies across 8 states and Union Territories (UTs) today.
Simultaneous polling being held in 35 Assembly constituencies in Odisha. pic.twitter.com/EZ1yEm7LJG
— ANI (@ANI) May 20, 2024

राज्यात शेवटच्या टप्प्यासाठी मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. महामुंबईतील नऊ जागांसह १३ मतदारसंघांत होणार्‍या मतदानातून दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम, ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत असे दिग्गज नशीब आजमावत आहेत. मुंबईतील सर्वच सहाही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदारांना आवाहन
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करा. लोकशाहीच्या या उत्सवात महिला आणि तरुण मतदारांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे विशेष आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

2024 लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.

#WATCH | Industrialist Anil Ambani casts his vote at a polling booth in Mumbai, for the fifth phase of #LokSabhaElections2024 pic.twitter.com/2CpXIZ6I0l
— ANI (@ANI) May 20, 2024

हेही वाचा : 

एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद देण्यास आमची हरकत नव्हती : शरद पवार
वाजपेयींच्या काळात संघाची गरज लागायची, आता भाजप सक्षम : जे. पी. नड्डा