वन विभागाचा नागपुरातील सुसज्ज पहिला पेडियट्रिक वार्ड!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माणसासाठी अत्याधुनिक इस्पितळे उभारली जात असताना राज्य वन विभागाकडून नागपुरातील सेमिनरी हिल्सस्थित ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातील पहिला सुसज्ज “पेडियाट्रिक वॉर्ड” सुरु झाला आहे. खास उन्हाळ्याच्या दृष्टीने या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांवर केवळ उपचारच नाही तर नव्या उमेदीने जगण्यासाठी त्यांना मायेची ऊबही दिली जात आहे. याशिवाय आईपासून दुरावलेल्या …

वन विभागाचा नागपुरातील सुसज्ज पहिला पेडियट्रिक वार्ड!

राजेंद्र उट्टलवार

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : माणसासाठी अत्याधुनिक इस्पितळे उभारली जात असताना राज्य वन विभागाकडून नागपुरातील सेमिनरी हिल्सस्थित ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातील पहिला सुसज्ज “पेडियाट्रिक वॉर्ड” सुरु झाला आहे. खास उन्हाळ्याच्या दृष्टीने या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांवर केवळ उपचारच नाही तर नव्या उमेदीने जगण्यासाठी त्यांना मायेची ऊबही दिली जात आहे. याशिवाय आईपासून दुरावलेल्या अपघातात जखमी झालेल्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांवरही या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
आजवर आपण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी खास पेडियाट्रिक वार्ड बघितले आहेत. मात्र, आता वन विभागाच्या पुढाकाराने वन्य प्राण्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी भारतातील हा पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरु झाला आहे. घनदाट जंगलातील वन्य प्राण्यांच्या संघर्षात किंवा जंगलातील विविध घटनांमध्ये जखमी झालेली वन्य प्राण्यांची पिल्ले आई गमावल्यानंतर अनाथ झालेल्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांना या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. सध्या या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये अस्वल, बिबट, कोल्हा, माकड, हरीण, विविध प्रकारचे पक्षी, कासव, साप यांची पिल्लं उपचार घेत आहेत. उपचारानंतर पुन्हा आपल्या हक्काच्या नैसर्गिक अधिवासात खेळण्यासाठी झेपावण्याच्या तयारीत आहेत.
इनक्युबेटरसह स्वतंत्र सुसज्ज वॉर्ड वन्य प्राण्यांच्या दृष्टीने देशात पहिले ट्रान्झिट सेंटर नागपुरात सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणी वन्यजीवांवर उपचार करताना त्यांच्या बाळांची आबाळ होत होती. अनेकदा जखमी अवस्थेत किंवा आईपासून दुरावलेले वन्यजीव या ठिकाणी उपचारासाठी आल्यावर अनेकदा त्यांचा मृत्यू होत होता.
हे लक्षात घेता आता प्रथमच या ट्रान्झिट सेंटरमध्ये दोन वॉर्ड या चिमुकल्या वन्यजीवांसाठी संरक्षित केले असून या ठिकाणी केवळ फिडर आणि डॉक्टर जातात बाकी वेळ हे वॉर्ड पूर्णतः आयसोलेटेड राहील अशी खबरदारी घेतली जात आहे.या माध्यमातून,होणाऱ्या फास्ट रिकव्हरीवर या वन्य जीवांच्या हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. यात अतिशय चांगले असे रिझल्ट आम्हाला मिळत आहेत.

अर्धांग वायू झालेले बच्चे वन्यजीवांवर देखील या ठिकाणी स्वतंत्र रूपाने उपचार होत आहेत. याशिवाय अशक्त वन्य जीवांसाठी इंक्युबेटरची सोय स्वतंत्र वार्डात करण्यात आली आहे.अर्थातच अशा पद्धतीचे सुसज्ज पेडियट्रिक वॉर्ड असलेले हे स्वतंत्र रुग्णालय आहे. या ठिकाणी उपवनसंरक्षक डॉ भारत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ राजेश फुलसुंगे, डॉ सुदर्शन काकडे, सिद्धांत मोरे, पंकज थोरात अशी वैद्यकीय चमू सतत कार्यरत आहे.
-कुंदन हाते, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ